इलेक्ट्रॅनिक वस्तू तुटल्यास आपोआप जोडणार हे तंत्र

मुख्य म्हणजे हे उपकरण भारतात बनवण्यात आले आहे.

Mumbai
gayzet
gayzet

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. जगभरात दररोज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नवनवीन शोध लागत असतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणात नवनविन अपडेट येत असतात. मात्र ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्यासाठी अत्यंत नाजुक असतात. बहुतेकदा ही उपकरणे वापरताना वाकतात, तुटतात आणि मग ही उपकरणे जोडणे शक्य होत नाही. ती निरुपयोगी होतात. मात्र आता भारत आणि ब्रिटीश संशोधकांच्या एका समूहाने अशी तुटलेली गॅजेट जोडणार एक उपकरण विकसीत केले आहे. त्यामध्ये व्हरबल डिवाइजेस म्हणजे इलेक्ट्रनिक घड्याळ, थरमोमीटर प्रामुख्याने ज्यात तांबे आहे अशा इलेक्ट्रॉनिक वस्तु तुटल्यास त्या आपोआप जोडल्या जातील असे तंत्र विकसीत केले आहे.

आपोआप होइल जोडणी

संशोधकांनी असा दावा केला आहे की या नव्या टेक्नोलॉजीने इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही तुटली किंवा वाकली तर ती स्वत: आपोआप जोडली जातील. त्यासाठी इतर कोणत्याही दुसऱ्या उपकरणांची किंवा साहित्याची आवश्यकता भासणार नाही. आजच्या घडीला बाजारात येणारी उपकरणे ही आकाराने लाहान, वजनाने हलकी मात्र टिकाऊ बनवण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो, मात्र त्या उपकरणांना बाहेरील डिवाईज जोडणीसाठीची जागा ही नाजूक असते. साध्या भाषेत बोलायच झाल तर मोबाइलची चार्जिंग करण्यासाठीची जागा, टॅब, वायर्स, माइक, पेंड्राइव, बॅटरी, ब्लूटूथ अशा इलेक्ट्रॉनिक गॅजेटस मधील इंटरनल डिवाइजेस, या अत्यंत नाजूक असतात. ती हाताळतांना त्यांच्या वायर तुटण्याची किंवा वाकण्याची शक्यता असते. या तंत्रज्ञानाने ही गॅजेट आपोआप जोडली जातील, भारतीय संशोधन विभागाने हा शोध लावल्याचे इंडिया सायन्स वायरने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे.

कसे काम करते उपकरण

भारतीय संशोधन विभाग बंगळुर यांनी हे उपकरण विकसित केले आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये प्रामुख्याने सिलिकॅान असते. त्यात काही प्रमाणात तांब्याचे ५ मायक्रोमिटर्सचे एक द्रव्य टाकण्यात आले. तांब्याचे हे द्रव्य इलेक्ट्रॅनिक गॅजेट तुटले, वाकले तर आश्यावेळी हे द्रव्य उष्णता निर्माण करते, त्यानंतर एखादे सर्किट ब्रेक झाल्यास या द्रव्याने एक साखळी बनवली जाउन ते डिवाइज आपोआप जोडले जाते. प्रायोगीक तत्वावर याची चाचणी करण्यात आली असून यावर अधिक संशोधन सुरु आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here