घरटेक-वेकचार्जिंग पॉईंट नसलेला स्मार्टफोन तुम्ही पाहीलाय का?

चार्जिंग पॉईंट नसलेला स्मार्टफोन तुम्ही पाहीलाय का?

Subscribe

Meizu या कंपनीने चार्जिंग पॉईंट नसलेला मोबाईल लाँच केला आहे. या मोबाईलला एकही बटण नाही. या मोबाईलचे नाव Meizu Zero असे आहे.

मोबाईल हा रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल शिवाय हल्ली एकही काम होत नाही. मोबाईलवर बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या आणि सहज झाल्या आहेत. या सुविधा आणखी सोयिस्कर, सोप्या आणि फायदेशीर व्हाव्या यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेला विज्ञानाची जोड मिळते आणि मोबाईल विश्वात एक वेगळे आव्हान उभे राहते. मोबाईल निर्मिती विश्वात असेच एक वेगळे आव्हान Meizu या कंपनीने उभे केले आहे. या कंपनीच्या मोबाईलने एक आगळावेगळा मोबाईल लाँच केला आहे. या मोबाईलला चार्जिंगचे पॉईंटच नाही. त्यामुळे आता चार्जर बाळगण्याचा कंटाळा येणाऱ्या युजर्सला चांगला फायदा होणार आहे.

हेही वाचा – अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या वस्तू ड्रोनद्वारे येणार?

- Advertisement -

असा असेल स्मार्टफोनचा चार्जर

या स्मार्टफोनला एकही होल नाही. होल नसलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनला आवाज कमी-जास्त करण्यासाठी एकही बटण नाही. बटणाऐवजी त्याठिकाणी टच पॅनल लावण्यात आला आहे. स्पीकरसाठी डिस्प्लेमध्येच पर्याय देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव Meizu Zero असे आहे. या स्मार्टफोनला चार्जिंग करण्यासाठी कंपनीने वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनला ५.९९ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सल फ्रंट तर १२ मेगापिक्सल बॅक कॅमेरा देण्यात आला आहे.


हेही वाचा – कावासाकीने भारतात लाँच केली निंजा झेडएक्स-६आर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -