घरटेक-वेकस्मार्टफोन युझर्सची झोप उडवणारा 'हा' व्हायरस

स्मार्टफोन युझर्सची झोप उडवणारा ‘हा’ व्हायरस

Subscribe

आपल्या जीवनातला अविभाज्य घटक झालेला स्मार्टफोन हा दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक होत आहे. तसेच स्मार्टफोनचे धोकेही तितकेच वाढत आहेत. क्वॉलकॉम प्रोसेसर असलेले अँड्रोइड स्मार्टफोन आणि टॅबलेट या युजर्संची ‘कॉलपॉन’ हा बग झोप उडवली आहे. ‘कॉलपॉन’ नावाचा एक बग आहे. हॅकर्स या बगचा वापर करून अँड्रोइड स्मार्टफोनचा हॅक करतात. जेव्हा स्मार्टफोन युझर आणि हॅकर एक वायफाय वापरत असतील तेव्हा स्मार्टफोन हॅक होण्याची जास्त शक्यता असते.

गुगलच्या आणि क्वॉलकॉम अॅंड्रोइड सिक्युरिटी टीमला या बगबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘कॉलपॉन’ हा बग तीन बग मिळून तयार झाला आहे. यामुळे युझर्सचा डेटा चोरला जाऊ शकतो. हॅकर हे क्वॉलकॉमच्या WLAN आणि मॉडेमसोबत ओव्हर – इअर (ओटीए)च्या मदतीने हॅक करू शकतात.

- Advertisement -

या बगची संशोधकानी गुगल पिक्सल २ आणि पिक्सल ३ या स्मार्टफोनवर केली. या चाचणीनंतर या व्हायरसचा फटका क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ आणि स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनला बसण्याची शक्यता आहे.

जगातील क्वॉलकॉम ही सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचे प्रोसेसर अनेक स्मार्टफोन कंपनी वापरते. या कंपनीनं त्याच्या अधिकृत वेबसाईटवर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५, ८४५, ७१०, ६७५ आणि या व्यतिरिक्त अन्य प्रोसेसर असलेले डिव्हाइसना धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कंपनीने फोन अपडेट करण्यासाठी सूचना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -