घरटेक-वेकयामुळे टिकटॉकला बसला सर्वात मोठा फटका; रेटिंग स्टार ४.५ वरून १.३वर!

यामुळे टिकटॉकला बसला सर्वात मोठा फटका; रेटिंग स्टार ४.५ वरून १.३वर!

Subscribe

देशात एकीकडे लॉकडाऊन सुरू आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर टिकटॉकर्स आणि युट्यूबर्स यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. दरम्यान या कोल्ड वॉरचा चांगलाच फटका टिकटॉकला बसला आहे. टिकटॉक अॅपची रेटिंग स्टार झपाट्याने कमी झाली असून ४.५ स्टार रेटिंगवरून ती १.३ स्टार रेटिंगवर घसरली आहे. पहिल्यांदा टिकटॉक रेटिंगमध्ये ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. या वॉर दरम्यान सोशल मीडियावर #BANTIKTOK असे हॅशटॅग देखील ट्रेंडिंगला होते. त्यामुळे सध्या अनेक जण टिकटॉक अॅप आपल्या फोनमधून अन इंस्टॉल करत आहेत.

टिकटॉक आल्यापासून अनेक लोक मिमिक्री करून किंवा एखाद्या गाण्यावर नाचून प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे अनेक टिकटॉक स्टार तयार झाले. मात्र यामुळे ओरिजनल व्हिडिओ तयार करणारे युट्यूबर्स चिडले. त्यानंतर युट्यूबवर एकाने टिकटॉकवाल्यांना ओरिजनल कंटेट काय कळतो वगैरे, अशी भाषा करणार व्हिडिओ तयार केला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी टिकटॉक स्टार आमिर सिद्दिकी मैदानात उतरला. या आमिर सिद्दीकीचे टिकटॉकवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असून तो स्वतःला एक सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर समजतो. त्याने युट्यूबर्सना तुम्ही तुमचे व्हिडिओ तयार करा आम्ही आमचे व्हिडिओ तयार करतो, कशाला वाद करायचा?, असे सांगितले. या आमिर सिद्दीकीला उत्तर देण्यासाठी रोस्टिंग करणाऱ्या कॅरी मिनातीने काहीतरी बोलावले, असे अनेक जणांचे मत होते.

- Advertisement -

त्यानंतर रोस्टिंग करणारा कॅरी मिनाती नावाचा युट्यूबर या मैदानात उतरला. त्यानंतर सोशल मीडियावर टिकटॉकर्स आणि युट्यूबर्समध्ये कोल्ड वॉर सुरू झाले. कॅरी मिनाती उर्फ अजय नागर या अवघ्या २० वर्षांचा असून त्याने या काळात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. त्याने आमिर सिद्दीकाला रोस्ट करणारा व्हिडिओ तयार केला. त्याच्या व्हिडिओला अवघ्या २४ तासात २४ लाखांपेक्षा अधिक व्हयूज आणि ४० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले होते. मात्र कॅरी मिनातीचा हा विक्रम व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेला व्हिडिओ युट्यूबने काढून टाकला. पण हे कोल्ड वॉर कॅरी मिनाती जिंकला असा अनेकांनी दावा केला. यामुळे आता टिकटॉकची रेटिंग झपाट्याने कमी झाली आहे.

- Advertisement -

टिकटॉकवर मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या अनेक व्यक्तींनी टिकटॉक अॅप अन इंस्टॉल केला. तसेच बिग बॉस सीझन १३ मधला हिंदुस्थानी भाऊ याने कॅरी मिनातीला सपोर्ट करून टिकटॉक अॅप अन इंस्टॉल केला. यासर्व प्रकारमुळे टिकटॉकला खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.


हेही वाचा – Lockdown: बिझनेस मॅनवर आली गाडीत राहण्याची वेळ!


 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -