आता ‘टिंडर’ अॅप बनले अजूनही सुरक्षित

युजर्सची माहिती लीक होण्याची शक्यता असल्याने केला बदल...

Mumbai
Tinder App
प्रातिनिधिक फोटो

‘टिंडर’ने आपल्या अॅपवरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नुकतेच सेफगार्ड बसवले आहे. या अॅपच्या सुरक्षीततेमध्ये कमतरता असल्याने त्याला हॅक करणे शक्य होते. हॅक करुन अॅपवरील माहिती बदलली जाऊ शकत असल्याने त्यावर असलेल्या प्रोपाईल्सची माहिती लीक होण्याची शक्यता होती. या बाबत पत्र मिळाल्यानंतर ‘टिंडर’ डेव्हलपर्सनी योग्य ते बदल केले असून हा अॅप अजूनही सुरक्षित केला आहे. ‘टिंडर’ एक डेटिंग अॅप असून यावरील युजर्स हे एकमेकांना डेट करु शकतात. भारतात हे अॅप मोठ्या प्रमाणावर वापले जात नसले तरीही जगभरातील अनेक युजर्स या अॅपचा डेटिंगसाठी करतात. अनेक युजर्सचे खाजगी फोटो व खाजगी माहिती या अॅपवर असते. ही खाजगी माहिती हॅक केली जाणार नसल्याची शाश्वती ‘टिंडर’ अॅपच्या संस्थापकांनी दिली आहे.

‘टिंडर’चा सर्व्हरडेटाबेस जुन्या पद्धतीचा आणि http कोडिंगवर आधारित असल्याने तो असूरक्षित होता. त्यामुळे हॅकर्स कोडिंगच्या सहाय्याने डाटाबेसमध्ये शिरु शकत होते. यामध्ये थोडी फेरबदल करुन ते कोणत्यीही युजर्सची माहिती मिळवू आणि त्यामध्ये फेरबदल करु शकत होते. ही माहिती कंपनीच्या लक्षात आल्यावर अॅपमध्ये आवश्यक फेरबदल केलेत.

‘टिंडर’ अॅप नक्की आहे तरी काय?
‘टिंडर’ एक डेटिंग अॅप असून स्मार्ट फोन युजर्स ‘प्ले स्टोर’ वरुन ते डाऊनलोड करु शकतात. ‘मॅच ग्रुप’ कंपनीद्वारे ते बनवल्यात आले आहे. जगातील ५० दशलक्ष नागरिक या अॅपचा वापर करतात. यापैकी १० दशलक्ष युजर्स या अॅपचा वापर नियमित करतात. या अॅपमध्ये समोरच्या युजर्सचे फोटो आणि संबधीत व्यक्ती बद्दल माहिती दिलेली असते. जर तुम्हाला समोरच्याची प्रोफाइल आवडली तर डाव्या बाजूला स्वाईप करु शकता. यामुळे तुमचे लाईक समोरच्या युजर्स पर्यंत जाते. समोच्या युजर्सलाही तुमची प्रोफाइल आवडली तर तीव्यक्ती तो लाईक स्वीकरुन तुमच्याशी चॉटिंग करण्यास सुरुवात करते. याच बरोबर दिवसातून एकदा टिंडरवर ‘सुपर लाइक’चा ऑप्शन मिळतो. लाइकचे बटन हार्टच्या आकाराचे असते तर सुपर लाइकचे बटन स्टारच्या आकाराचे असते. तुमचा फोन ज्या लोकेशनला असेल त्याठिकाणचे युजर्स टिंडरवर दिसतात.