घरटेक-वेकWhatsapp ला टक्कर देण्यासाठी ट्रूकॉलर तयारीत; लाँच करणार नवी सेवा

Whatsapp ला टक्कर देण्यासाठी ट्रूकॉलर तयारीत; लाँच करणार नवी सेवा

Subscribe

ही सेवा केल्याने Whatsapp तसेच गूगल डुओला एकप्रकारे आव्हान मिळणार आहे.

Whatsappला टक्कर देण्याकरिता ट्रूकॉलर लवकरच युजर्ससाठी VoIP सेवा सुरू करणार आहे. ही सेवा केल्याने Whatsapp तसेच गूगल डुओला एकप्रकारे आव्हान मिळणार आहे. टेलिकॉमच्या आहवालानुसार, ट्रूकॉलर सुरू करणाऱ्या सेवेत ‘ट्रूकॉलर वॉइस’ हे फिचर आणणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर ट्रूकॉलर युजर्स Whatsapp सारखे वॉइस कॉल करू शकणार आहे.

- Advertisement -

ट्रूकॉलरची ही सेवा अद्याप अॅपच्या प्रीमिअम यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या सेवेला सध्या अॅण्डरॉईड ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र याशिवाय कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. ही सेवा वापरून फोन करायचा असल्यास ट्रूकॉलर हे अॅप ओपन करून कॉलर प्रोफाईलमध्ये वॉईसचा पर्याय दिसेल, या पर्यायाद्वारे युजर्सना कॉल करता येणार आहे.

- Advertisement -

ट्रूकॉलरने आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन चार्जला ३० रुपयांपेक्षा वाढून ४९ रुपये करण्यात आले आहे. मात्र आता याची वार्षिक मेंबरशिप १९ रूपये दर महिना असून त्याचा कर २२५.५० रूपये इतका आहे. यासोबत पुर्ण वर्षभरासाठी ४ हजार ९९९ रूपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -