घरटेक-वेकआता ट्विटही करता येणार एडिट

आता ट्विटही करता येणार एडिट

Subscribe

फेसबुकप्रमाणेच आता ट्विटरवरचे ट्विटही एडिट करता येणार आहेत. तसं नवीन फिचर लवकरच लाँच होणार असून त्यामुळे ट्विटर अधिक युझर फ्रेन्डली होणार आहे.

फेसबुकप्रमाणेच आता ट्विटरवरचे ट्विटही एडिट करता येणार आहेत. तसं नवीन फिचर लवकरच लाँच होणार असून त्यामुळे ट्विटर अधिक युझर फ्रेन्डली होणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर लवकरच ५ ते ३० सेकंदांचा डिले फिचर आणत आहेत. यामुळे ट्विट पोस्ट केल्यानंतर काही वेळात एडिट करता येईल आणि पुन्हा पोस्ट करता येईल. ट्विटर हे मोबाइलवरील एसएमएसच्या धर्तीवर तयार करण्यात आल्यामुळं त्यावर एडिटिंगचं फिचर उपलब्ध नव्हतं. पण गेल्या काही वर्षांपासून असं फिचर उपलब्ध करून द्या, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. यावर विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असं डोर्से म्हणाले. फेसबुकवर आधीपासूनच पोस्ट आणि कमेंट एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

वाचा – फेसबुक आणि ट्विटरवर आता दिसणार नाहीत खोट्या बातम्या

- Advertisement -

खोट्या बातम्यांना आळा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यालाही आळा बसणार असल्याची दिलासादायक माहिती देण्यात आली होती. सोशल मीडिया हे सध्याचं सर्वात वेगवान माध्यम आहे. दरदिवशी कितीतरी खोट्या बातम्या वा अफवा या सोशल मीडियामध्ये पसरत असतात. मात्र फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरण्याला आळा बसणार असल्याचे सांगण्यात आले होते. याला आळा बसण्यासाठी वैज्ञानिकांनी एका वेबवर आधारित सॉफ्टवेअर शोधून काढले होते. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या वैज्ञानिकांद्वारे हे टूल शोधण्यात आले. या टूलचे नाव नॉव्हेल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -