घरटेक-वेकट्विटरची युजर्सना खूशखबर, 'हे' नवं फिचर करणार लाँच

ट्विटरची युजर्सना खूशखबर, ‘हे’ नवं फिचर करणार लाँच

Subscribe

युजर्सना या आधी व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इंन्स्टाग्राम प्रमाणे स्टोरी टाकता येत नव्हती, आता युजर्सला त्याचा आनंद ट्विटरवर देखील घेता येणार आहे. युजरने ट्विटरवर एखादे ट्विट केल्यानंतर त्याची टाइमलाइन युजर्सना पाहता येणार आहे.

ट्विटर आपल्या युजर्ससाठी एक नवे फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमुळे युजर्सना आता व्हॉट्सअॅप आणि फेसबुक प्रमाणे टाइमलाइन अपलोड करता येणार आहे. अनेक दिवसांपासून ट्विटरवर एडिट ट्विट करता यावे यासाठी एखादे नवे फिचर आणावे, अशी मागणी युजर्सकडून केली जात होती. मात्र या ऐवजी एका फिचरच्या लाँचिंगसाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यामुळे युजर्स आता ट्विटरवर केवळ ट्विट नाही तर फ्लिट देखील करू शकणार आहेत.

टाइमलाइन पाहू शकणार युजर्स

युजर्सना या आधी व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम प्रमाणे स्टोरी टाकता येत नव्हती. आता युजर्सला त्याचा आनंद ट्विटरवर देखील घेता येणार आहे. युजरने ट्विटरवर एखादे ट्विट केल्यानंतर त्याची टाइमलाइन युजर्सना पाहता येणार आहे. ट्विटरवर फ्लिट नावाचे एक फिचर लाँच करण्यात येणार आहे. या फिचरची चाचणी कंपनीकडून केली जात आहे. हे फिचर आता भारतात वापरता येत नसले तरीही लवकरच कंपनी ते लाँच करणार आहे. सध्या ब्राझीलमध्ये हे फिचर सुरू करण्यात आले आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

- Advertisement -

२८० टेक्समध्ये कॅरेक्टरचा समावेश

युजरने ट्विटरवर एखादी पोस्ट केल्यावर ती व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामप्रमाणे टाइमलाइनवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हे टाइमलाइन २४ तासानंतर आपोआप बंद होईल. ट्विटरवरील फ्लिटच्या माध्यमाने युजर्सना २८० टेक्समध्ये कॅरेक्टर अॅड करता येणार आहे. युजर्सने ज्या अकाऊंटला फॉलो केले त्यांचे टाइमलाइन वेगळ्या टॅबमध्ये पाहता येणार आहे. मात्र यावेळी युजर्स कोणत्याही फ्लिटला रिट्विट करता येणार नाही आहे. असे असले तरीही फेसबुकच्या स्टोरीप्रमाणे युजर्स इतरांच्या टाइमलाइला रिअॅक्ट होता येणार आहे. लवकरच हे फिचर इतर देशात देखील लाँच केले जाणार आहे.


हेही वाचा- भाग दोन ३ मिनिटांत आटोपला; वाढती तूट लपवण्याचा प्रकार – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -