घरटेक-वेकस्पॅमर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्विटरचे महत्त्वपूर्ण पाऊल

स्पॅमर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्विटरचे महत्त्वपूर्ण पाऊल

Subscribe

कोणताही ट्विटर युजर एका दिवसांत ४०० हून जास्त नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. याआधी ही मर्यादा १००० होती. एका दिवसांत तुम्ही फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या आम्ही १००० वरून ४०० वर आणली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्सने काही बदल करत व्हॉट्सअप नंतर ट्विटरने देखील एक घोषणा केली आहे. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे, ट्विटर वापरताना कोणत्याही व्यक्तीला एका दिवसात ४०० पेक्षा जास्त युजर्सना फॉलो करता येणार नाही. अशी माहिती ट्विटरच्या सुरक्षा टीमने एक ट्वीट करून नवीन नियमांबद्दल सांगितले.

नव्या अकाऊंट्स फॉलो करण्यावर मर्यादा

कोणताही ट्विटर युजर एका दिवसांत ४०० हून जास्त नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. याआधी ही मर्यादा १००० होती. एका दिवसांत तुम्ही फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या आम्ही १००० वरून ४०० वर आणली आहे. यामुळे, कंपनीने एका दिवसात फॉलो करण्यात येणाऱ्या अकाऊंटची संख्या मर्यादित केली आहे. पहिले एका दिवसात १००० अकाऊंट्स फॉलो करता येत होते. मात्र आता ट्विटरने ही संख्या कमी करून ४०० केली आहे. स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे युजर्संना कोणताही त्रास होणार नाही,’ असे ट्विटरने ट्वीट करून म्हटले आहे.

- Advertisement -

स्पॅमर्सवर नियंत्रण ठेवता येणार

ट्विटरच्या अकाऊंटची संख्या ४०० पर्यंत मर्यादित केल्याने स्पॅम मॅसेज पाठविणाऱ्या स्पॅमर्सवर आळा घालणे शक्य होणार नाही. परंतु ट्विटरच्या साईट इंटिग्रिटीचे मुख्य हेड योएल रोथ यांनी सांगितले की, ही मर्यादा आणल्याने स्पॅमर्सवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -