राजकीय जाहिरातींवर ट्विटर आणणार निर्बंध

२२ नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणं होणार बंद

Mumbai

भारतीय राजकारणात प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा चांगलाच वापर केला जातो. भारतीय राजकारणात राजकीय जाहिरातींचा अधिक भडीमार सोशल मीडियावर केला जातो. या सोशल मीडियातील मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा सर्वात जास्त वापर राजकीय जाहिरातींकरता केला जातो. मात्र आता ट्विटरने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाही कारण ट्विटरने सर्व राजकीय जाहिराती बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी केली आहे. या निर्णयाची घोषणा करताना त्यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

२२ नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती बंद

‘आम्ही जगातील सर्व राजकीय जाहिरातींवर निर्बंध आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राजकीय जाहिरातीतील संदेश इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे मात्र तो विकत घेतला जाऊ नये.’, असे जॅक यांनी ट्विट केले आहे. याच जॅक यांनी घेतलेल्या निर्णयामुळे २२ नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणं बंद होणार आहे. या राजकीय जाहिरातींवर निर्बंध आणण्यापूर्वी जाहिरातदारांना पुर्व सूचना तसेच नोटिस देण्यात येणार आहे.

इंटरनेटवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती या खूप प्रभावी आणि ताकदवान ठरतात. व्यवसायिक जाहिरातींची प्रसिद्धी होणं ठिक आहे. मात्र राजकीय जाहिरातींच्या बाबतीत ही जोखीम ठरू शकते. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींचा उपयोग हा राजकारणामध्ये सर्वाधिक मतं मिळवण्यासाठी किंवा मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो. या जाहिरातींचा परिणाम अनेकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असल्याचे जॅक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here