Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक सावधान! गुगलच्या एका क्लिकवर दिसतंय तुमचं What's App प्रोफाईल आणि फोन नंबर!

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर दिसतंय तुमचं What’s App प्रोफाईल आणि फोन नंबर!

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय असणारं अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअप. मात्र आता या सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत बरेच वाद होत आहेत. दरम्यान, गुगलवर सर्च केल्यानंतर व्हॉट्सअॅप प्रायव्हेट ग्रृप पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. आता कोणीही Google वर तुमच्या व्हॉट्सअॅपचे प्रायव्हेट ग्रृप शोधून त्यात सहभागी होऊ शकते. यासह गुगल सर्चमध्ये तुमचा फोन नंबर आणि प्रोफाईल पिक्चर सुद्धा दिसत असल्याच्या चर्चा युजर्समध्ये सुरू आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात काही पब्लिक ग्रृप गुगल सर्चमध्ये दिसायला लागले होते तेव्हा गुगल आणि व्हॉट्सअपची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा व्हॉट्सअप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत आहे. Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल फोटोसुद्धा गुगल सर्चमध्ये दिसत आहे. ही परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. यासह कोणाकडे व्हॉट्सअप ग्रृपची URL link असेल तर गुगलवर ती सर्च केल्यास थेट त्या ग्रृपमध्ये सहभागी होऊ शकतात.

- Advertisement -

एका अहवालातून असेही समोर आले आहे की, यूजर्स व्हॉट्सअप लिंकसह ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच त्या ग्रुपमधील मेंबर्सचा फोन नंबरही पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरने केलेल्या पोस्ट, चॅट्सही गुगलवर सर्च करून बघता येऊ शकातात. सध्या ही माहिती उघड झाली नाही की, अखेर व्हॉट्सअॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले आहे. परंतु, जवळपास १५०० ग्रुप इनव्हाइट लिंक सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करीत आहे. तर काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत. युजर प्रोफाइल पाहिल्यास गुगलने युजर्सचा प्रायव्हेट अकाउंट दिसणे सुरू केले आहे. यामध्ये युजर्सच्या प्रोफाइल फोटोसह त्याचे नावाचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपच्या डोमेनवर कंट्री कोड टाकून युजर प्रोफाइल पाहू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, साधारण ५००० प्रोफाइल आता सार्वजनिक झाले आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप या ठिकाणी robots.txt फाइलचा वापर करीत नाही. सध्या व्हॉट्सअॅप आणि गुगलने यासंबंधी कोणतीही माहिती दिली नाही.

WhatsApp च्या नव्या अटी आणि शर्ती

नुकत्याच WhatsApp च्या नव्या अटी आणि शर्ती युजर्स समोर आणल्या गेल्या आहेत. या नव्या धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असे म्हटले जातेय की, आपली WhatsApp ची सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल.

- Advertisement -

मात्र व्हॉट्सअॅप प्राय़व्हसीवरून वाद झाल्यानंतर यावर व्हॉट्सअॅपने स्पष्टीकरण दिल्याचे समोर आले आहे. युजर्सचे चॅट्स, मेसेजेस आणि कॉल डिटेल्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, व्हॉट्सअपमधील कमतरता पुन्हा एकदा समोर आली असून हा बग आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र ही चूक दुरुस्त करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सध्या देण्यात आले आहे.

- Advertisement -