Vivo आणणार आपोआप रंग बदलणार स्मार्टफोन

vivo is working on back panel color changing smartphone may launch soon in market
Vivo आणणार आपोआप रंग बदलणार स्मार्टफोन

व्हिवो (Vivo)बद्दल उघडकीस आलेल्या माहितीनुसार, कंपनी एक असा स्मार्टफोन बाजारात लाँच करत आहे. जो स्मार्टफोन बॅक पॅनलचा रंग आपोआप बदलेल. हे एक जबरदस्त तंत्रज्ञान असून आतापर्यंत असा कोणताही स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झालेला नाही. अशा परिस्थितीत व्हिवोचा हा आगामी स्मार्टफोन त्याच्या खास फिचरमुळे चर्चेत आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलला इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास वापरला जाईल, ज्यामुळे फोनचा रंग आपोआप बदलू शकेल.

Android Authority च्या अहवालानुसार, व्हिवोने आपल्या आगामी स्मार्टफोनचा एक टीझर जारी केला आहे आणि या टीझरमध्ये खास तंत्रज्ञानासह स्मार्टफोनची संकल्पना दाखवली आहे. यामध्ये फोनच्या बॅक पॅनलमध्ये रंग आपोआप बदलताना दिसतो. यासाठी कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये इलेक्ट्रोक्रोमिक ग्लासचा वापर केला आहे. यापूर्वी व्हिवोची मूळ कंपनी बीबीके इलेक्ट्रॉनिक्सने वनप्लसच्या अशाच एका स्मार्टफोनची संकल्पना दाखवली होती. या संकल्पनेत अशा प्रकारे ग्लासचा उपयोग केला आहे.

माहितीनुसार, व्हिवोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये या अनोख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्स आपल्या आवडीनुसार फोनचा कलर व्हेरिएंट बदलू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, कलर बदलण्यासाठी इलेक्ट्रोक्रोमिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे आणि युजर्स फोनमध्ये असलेल्या साईड बटन दाबून कलर बदलू शकतात. कंपनीने हे अनोख्य तंत्रज्ञान असलेल्या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख किंवा फिचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही आहे.


हेही वाचा – Whatsapp चॅटिंग सुरक्षित राहण्यासाठी जाणून घ्या चार दमदार सेटिंग्स