भारतात विवो व्ही १५ खरेदीसाठी दाखल

भारतात विवो व्ही १५ हा स्मार्टफोन लॉंच आज खरेदीकरता दाखल झाला आहे.

Mumbai
vivo v15 now available specifications price with 6 gb ram
भारतात विवो व्ही १५ दाखल

विवोने गेल्या आठवड्यात आपला विवो व्ही १५ हा स्मार्टफोन भारतात लॉंच केला होता. हा स्मार्टफोन आजपासून भारतात खरेदीसाठी दाखल झाला आहे. या स्मार्टफोनची थेट स्पर्धा भारतीय बाजारातील ओप्पो एफ ११ प्रो सोबत असणार आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

या आहेत स्मार्टफोनला ऑफर्स

स्मार्टफोन खरेदी कऱण्यासाठी एसबीआय डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय २ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंटही हा स्मार्टफोन खरेदी करताना मिळणार आहे. त्याचबरोबर बजाज फिन सर्व कार्डवर नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शनही आहे. विवो व्ही १५ खरेदी केल्यास त्यावर रिलायन्स जिओ १० हजारापर्यंत मिळणार आहे.

ही आहे स्मार्टफोनची किंमत

विवो व्ही १५ च्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला नाही. विवो व्ही १५ प्रोमध्ये इन – डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा स्मार्टफोन टोपाझ ब्लू आणि ग्लॅमर रेड रंगात उपलब्ध आहे आणि याच्या वरच्या बाजूला ग्रेडिएंट फिनिश देण्यात आला आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत २३ हजार ९९० रुपये असून हा विवो व्ही प्रो भारतात २८ हजार ९९० रुपयांच्या किंमतीला लाँच करण्यात आला आहे. तर फोन फक्त ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे.


वाचा – Mi आणणार ऑनलाइन नेट बॅंकिंग अॅप

वाचा – Xiaomi १ एप्रिलला ५५ मिनीटांत २० प्रोडक्ट लॉंच