vivo v15 अॅडवान्स बुकींग आजपासून सुरु; अशी करता येईल बुकींग

पॉप अप सेल्फी कॅमेरा ६ जीबी रॅम आणि आणखीन बरच काही, जाणून घेण्यासाठी हे वाचा.

Mumbai
vivo v15
वीवो वी१५

सध्या वीवो वी१५ हा मोबाईल फोन बाजारात चांगलाच ट्रेंड करत आहे. मागील आठवड्यातच वीवो वी१५ भारतात लॉंचकरण्यात आला असून त्याला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मोबाईल फोनची भारतीय किंमत २३९९० आहे. मागील महिन्यात कंपनीने आणलेल्या वीवो वी१५ प्रोची भारतीय किंमत २८,९९० इतकी होती. आज २५ मार्चपासून वीवो वी१५ फोनची भारतात अॅडवान्स बुकींग सुरु होत आहे. १ एप्रिल पासून या फोनचा ऑनलाइन आणि ऑफलाइन सेल सुरु होत आहे. पॉप अप सेल्फी कॅमेरा आणि ६ जिबी रॅम ही वीवो वी१५ ची खास वैशिष्ट्येआहेत.

येथे करता येईल बुकींग

१ एप्रिल पासून वीवो वी१५ चा ऑनलाइन आणि ऑफलाइन सेल सुरु होत असून वीवो च्या शॉपमध्ये, गॅलरीमध्ये तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिको आणि सगळ्या मोबाईल शॉपमधून या फोनची विक्री केली जाणार आहे. वीवो वी१५ आणि वी१५ प्रो हे दोन्ही मोबाईल फोनचा लुक जवळपास सारखाच आहे. या दोन्ही फोनमधील फिचर्स देखील काही प्रमाणात सारखेच आहेत.

हे आहेत फिचर्स

१) वीवो वी१५ ला पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे, त्याच बरोबर या फोनमध्ये ट्रीपल कॅमेरा आहे.
२) या फोनची बॅटरी 4000 mah इतकी आहे.
३) ६ जीबी रॅम आणि ६४ इंटरनल स्टोरेज, २६४ जीबी पर्यंत मेमरी कार्ड टाकुन स्टोरेज वाढवता येईल.
४) २.५ डी ग्लास, अल्टा फुल स्क्रीन, ६.५३ इंच डिस्प्ले
५) ९.० पाय अॅंड्रॅाइड सिस्टीम, २.१ ऑक्टाकोर प्रोसेसर
६) या फोनचा लुक स्पोर्टी असून हा फोन वीवो वी१५ प्रो पेक्षा आकाराने स्लीम आहे
७) रेड ब्लॅक कॉंबीनेशन, ब्लु ब्लॅक कॉंबीनेशन, रेड असे कलरचे तीन पर्याय उपलब्ध आहेत.