घरटेक-वेकविवो झेड वन प्रोचा उद्या सेल

विवो झेड वन प्रोचा उद्या सेल

Subscribe

पहिल्या संधीमध्ये मोबाईल घेऊ न शकणाऱ्या ग्राहकांना विवो झेड वन प्रो विकत घेण्याची आणखीन एक संधी प्राप्त झाली आहे.

विवो झेड वन प्रो घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी विवोतर्फे दुसऱ्या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. विवोचा पहिला सेल काही मिनीटांतच संपल्याने मोबाईल घेऊ न शकणाऱ्या ग्राहकांना दुसरी संधी उपलब्ध झाली आहे. विवो झेड वन प्रोचा (vivo Z1 Pro)दुसरा सेल फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाइट विवो डॉट कॉमवर उद्या १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

विवो झेड वन प्रो चे वैशिष्ट्य असे की हा फोन एकदा चार्ज केल्यास ४० तास सतत या फोनवर बोलू शकता. विशेष म्हणजे तासनंतास गेम खेळणाऱ्यांसाठी हा फोन उपयुक्त ठरणारा आहे. कारण की ७ तासांपर्यंत सतत या फोनवर गेम खेळता येऊ शकतो. ४ जीबी रॅम आणि ६४ स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७ हजार ९९० रुपये इतकी आहे. यावेळी आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ७५० रुपयांचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे.

- Advertisement -

विवो झेड वन प्रोची वैशिष्ट्ये

६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
२३४०X१०८० रिझोल्यूशन पिक्सल
३२ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा
तीन रियर कॅमेरे, ८ मेगापिक्सल (पहिला), १६ मेगापिक्सल (दुसरा), २ मेगापिक्सल (तिसरा)
५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -