घरटेक-वेकVodafone-Idea ची आता नवी ओळख, लाँच केला नवा ब्रँड

Vodafone-Idea ची आता नवी ओळख, लाँच केला नवा ब्रँड

Subscribe

दोन वर्षांपूर्वी एकत्र आलेल्या टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोन आणि आयडियाने नवा ब्रँड लाँच केला आहे. आजपासून VI या नावाने कंपनी ओळखली जाणार आहे. कंपनीने काल यांसदर्भात इशारा दिला होता. आज कार्यक्रम आयोजित करत नव्या ब्रँडचं आणि लोगोचं अनावरण केलं. दोन्ही कंपन्यांची नावे एकत्र करुन VI नावाचा ब्रँड लाँच केला आहे. V म्हणजे Vodafone आणि I म्हणजे Idea.

Vodafone कंपनीने निवेदन जारी करत म्हटलं आहे की, VI चे भविष्याचे प्लॅन तयार आहे आणि या एका ब्रॅण्डच्या नावाखाली दोन्ही कंपन्या व्यवसाय करतील. 4G सोबत 5G वर काम सुरु आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. विलीनीकरणानंतर देशभरात 4G चं जाळं दुप्पट झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. दरम्यान, कंपनीने यावेळी नव्या प्लॅनची घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

- Advertisement -

कंपनीने VI ब्रँडची www.myvi.in ही नवीन वेबसाइटही बाजारात आणली असून सरप्राइज ऑफर देखील जाहीर केली आहे. दोन वर्षांपूर्वी Vodafone-Idea चे विलीनीकरण झालं होतं. तेव्हापासून, दोन्ही कंपन्या एकत्रित करण्याचं काम चालू होतं. आज VI ब्रँड या नावाने कंपनीला नव्याने लाँच केलं, असं कंपनीचे कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -