घरटेक-वेकआता मिळवा व्होडाफोन 4G वर 4GB डेटा

आता मिळवा व्होडाफोन 4G वर 4GB डेटा

Subscribe

व्होडाफोनने 4G नेटवर्कवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना 3G सिम कार्डवरून 4G सिम कार्डवर अपग्रेड केल्यानंतर दूरसंचार ऑपरेटर आता 4 जीबी डेटा फ्रीमध्ये देत आहे.

सध्या भारतातील बीएसएनएल अनेक राज्यांमध्ये 4G नेटवर्क विस्तारीत करण्यात व्यग्र आहे आणि कंपनी 3G सिम कार्ड्स असणाऱ्या ग्राहकांना मोफत डेटा देत आहे. तसेच, व्होडाफोनने 4G नेटवर्कवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्राहकांना 3G सिम कार्डवरून 4G सिम कार्डवर अपग्रेड केल्यानंतर दूरसंचार ऑपरेटर आता 4GB डेटा फ्रीमध्ये देत आहे. देशभरातील काही राज्यांत बीएसएनएलचे 4G नेटवर्क आल्यानंतर व्होडाफोनने 4G नेटवर्कची खास ऑफर ग्राहकांसाठी आणली आहे. ज्या व्होडाफोन ग्राहकांकडे 3G सिम कार्ड असणार आहे. त्यांना या ऑफरचा लाभ घेता येईल. 3G सिमचे 4G मध्ये अपग्रेड झाल्यानंतर, ग्राहकांना 4GB फ्री डेटा दिला जाईल.

VoLTE स्मार्टफोन धारकांसाठी..

जर 4G VoLTE असणारा स्मार्टफोन असल्यास व्होडाफोनच्या या ऑफरचा लाभ ग्राहकांना सहज घेता येईल. सध्या सर्वच स्मार्ट फोन अद्यावत (VoLTE) असल्याने 10,000 रुपयांचा स्मार्ट फोन असणाऱ्या ग्राहकांना 4G डेटाची सुविधा घेता येणार आहे. याउलट, बीएसएनएलच्या 4G सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी त्याचे फायदे कमी आहेत. ज्या बीएसएनएल ग्राहकांचे 3G मधून 4G सिम कार्ड रूपांतर झाले आहे त्यांना 2GB ते 4GB डेटा फ्री मध्ये मिळणार आहे.

- Advertisement -

तरूणांसाठी खास ऑफर

तसेच, व्होडाफोनने अलीकडेच तरुणांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये व्होडाफोन अॅमेझॉन प्राइम वार्षिक सबस्क्रिप्शन ५० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. ही ऑफर केवळ १८ ते २४ वर्षे वयोगटातील ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. व्होडाफोन आणि बीएसएनएल आपल्या ग्राहकांना वेगवान 4G नेटवर्क्समध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर जिओ आकर्षक डेटा प्लॅनसह अधिक ग्राहकांना आपल्या सेवेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -