घरटेक-वेकव्होडाफोन ग्राहकांना मिळणार २,५०० ची कॅशबॅक ऑफर

व्होडाफोन ग्राहकांना मिळणार २,५०० ची कॅशबॅक ऑफर

Subscribe

व्होडाफोन ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. बिल पेमेंट्स केल्यानंतर युजर्ससाठी व्होडाफोन कंपनीने कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर मोबाइल रिचार्जसाठीही उपलब्ध आहे. कंपनीच्या या ऑफर्सचा लाभ सध्याचे युजर्सही घेऊ शकतात.

सध्या बाजारात कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. अशातच व्होडाफोन ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीने व्होडाफोन सीम धारकांसाठी एक स्किम आणली आहे. बिल पेमेंट केल्यानंतर युजर्ससाठी व्होडाफोन कंपनीने एक कॅशबॅक ऑफर आणली आहे. कॅशबॅक स्कीम साठी व्होडाफोनने पेटीएमसोबत पार्टनरशीप केली आहे. कंपनीच्या या ऑफर्सचा लाभ सध्याचे वापरकर्तेही घेऊ शकतात. ही ऑफर मोबाईल रिचार्जसाठीही उपलब्ध आहे.

४९९ रुपयांचा प्लान लाँच –

व्होडाफोनने नुकताच ४९९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. दररोज १.५ जीबी डेटा ऑफरच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस दिले जाणार आहे. प्लान जी ५ आणि व्होडाफोन प्लेच्या फ्री सब्सक्रिप्शनसोबत येतो. हा प्लान काही सर्कलमध्ये ७० दिवसांच्या वैधतेसह आणि काही ठिकाणी ६० दिवसांच्या वैधतेसह दिला जातो.

ऑफरसाठी प्रोमो कोड बंधनकारक –

व्होडाफोनची ही ऑफर मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही पेमेंट करण्यासाठी VODANEW2500 हा प्रोमो कोड वापरणे गरजेचे आहे. सध्याच्या वापरकर्त्यांनाही VODA2500 प्रोमो कोड अप्लाय करणे गरजेचे आहे. जर तुम्ही यामध्ये लकी ठरला तर तुम्हाला रिचार्ज बिल पेमेंट केल्यानंतर २४ तासांत पेटीएमचे बक्षीस मिळेल.

ऑफर मर्यादीत –

व्होडाफोनचा हा रिचार्ज यशस्वी झाल्यानंतर वापरकर्त्यांना १५ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच राहिलेले २ हजार ४८५ रुपये पेटीएम चित्रपट, फ्लाइट, बस किंवा पेटीएम फर्स्ट व्हाऊचर दिले जाण्याची शक्यता आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना आपला नंबर कमीत कमी १४९ रुपयांच्या पॅकवरून रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच, ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी असल्याचे पेटीएमने सांगितले आहे. ही ऑफर ग्राहकांच्या पसंतीस येते का हे लवकरच कळेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -