कावासाकी भारतात आणणार डब्ल्यू ८०० बाईक

Mumbai
कावासाकी डब्ल्यू ८०० बाईक

भारतीय बाजारपेठेत रॉयल इन्फील्डला जोरदार टक्कर देण्याची तयारी कावासाकीने केली आहे. कासावाकी आपली डब्ल्यूू ८०० ही बाईक भारतात लाँच करणार आहे. सध्या इटलीतील मिलानमध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आहे. मात्र ही बाईक भारतात हंगामा करेल आणि भारतातील तरुण पिढी इन्फील्ड आणि ट्रायम्फ बाईक विसरतील, असा अंदाज बाईकतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कावासाकी डब्लू८००मध्ये ७७३ सीसी, एअरकूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड, एसओएचसी इंजिन आहे. इंजिनची क्षमता ६५०० आरपीएमवर ४७.५ अश्वशक्ती आणि ४८०० आरपीएमवर ६२.५ एनएम टॉर्क इतकी आहे. इंजिनमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स असणार आहे. बाइकच्या ब्रेकिंगमध्ये फ्रंटला ३२० एमएम डिस्क आणि रिअरमध्ये २७०एमएम डिस्क आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बाइक स्ट्रीट आणि कॅफे रेसर या दोन प्रकारात उपलब्ध आहे. भारतात फक्त स्ट्रीट बाइक लाँच करण्यात येणार आहे. शोरुम किंमत सुमारे सहा लाख असण्याची शक्यता आहे.

किंमतीच्याबाबतीत ही बाइक ट्रायम्फ स्ट्रीटपेक्षा स्वस्त असून रॉयल इन्फील्ड ६५० सीसीच्या बाइकपेक्षा महाग आहे. ट्रायम्फ स्ट्रीटची किंमत जवळपास ८ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर रॉयल इन्फील्डची किंमत अडीच लाख असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here