घरटेक-वेकव्हॉट्सअपने आणलं आणखी एक नवं फिचर!

व्हॉट्सअपने आणलं आणखी एक नवं फिचर!

Subscribe

व्हॉट्सअपवरील अनेक ग्रृपमध्ये आपली ईच्छा नसतांनी ग्रृपमध्ये सहभागी व्हावे लागायचे. परंतु, युजर्सना आता हा निर्णय घेणार आहे.

सोशल मीडियावर सर्वाधिक वापरले जाणारे चॅटिंग अॅपमध्ये व्हाट्सएप हे युजर्सच्या अधिक पसंतीचे आहे. भारतातील २०० दशलक्षांपेक्षा अधिक लोक सध्या व्हॉट्सअप वापरतात. त्वरीत संदेश देता येणाऱ्या व्हॉट्सअप मॅसेजिंग अॅपने बुधवारी सांगितले की, आता युजर्स स्वतः एक निर्णय घेऊ शकणार आहेत. तो असा की, व्हॉट्सअपवरील अनेक ग्रृपमध्ये आपली इच्छा नसतांनी ग्रृपमध्ये सहभागी व्हावे लागायचे. परंतु, युजर्सना आता हा निर्णय घेणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता ॲडमिनचे राज्य चालणार नाही. त्यामुळे आता तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये ॲड करता येणार नाही.

असं असेल नवं फिचर

फेसबुकच्या मालिकीच्या असणाऱ्या या अॅपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. कारण निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म सर्वसाधारण निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यापुढे कोणत्याही ग्रृपमध्ये सामील होण्यासाठी त्या व्यक्तीच्या परवानगीची असणं आवश्यक आहे. यासोबतच त्या व्यक्तीला  इन्व्हीटेशन पाठवावे लागणार आहे. या वैशिष्ट्याची चाचणी आधीपासून केली जात होती. मात्र आता हे फिचर व्हॉट्सअपने लॉंच केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍प ‘ग्रुप इन्विटेशन’ हे नवीन फीचर देखील लवकरच लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍पचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे.

- Advertisement -

निवडा हवा तो पर्यांय

व्हॉट्सअप युजर्सना ग्रृपमध्ये समाविष्ट होण्यासाठी Nobody, My Contacts,आणि Everyone यापैकी पर्यांय निवडता येणार आहे. यामुळे कोणत्या ग्रृपमध्ये समाविष्ट व्हायचे की नाही, हे सर्वस्वी व्हॉट्सअप युजर्सना ठरवता येणार आहे. आजपासून व्हॉट्सअप हे नवीन फिचरला लॉंच करणार आहे. जगभरातील व्हॉट्सअप युजर्सना हा पर्यांय व्हॉट्सअप सेंटींगमधून निवडता येणार आहे.

फसव्या माहितीची करा तक्रार

व्हॉट्सअपने अलीकडेच लोकसभा निवडणुकीत खोट्या, फसव्या बातम्या आणि अफवांना आळा घालण्यासाठी भारत-केंद्रित तथ्य-तपासणी यासाठी या वैशिष्ट्याची घोषणा केली. युजर्स आता व्हॉट्सअप आलेल्या फसवी माहिती किंवा अफवांची तक्रार करू शकतात (+ 9 1-9 643-000-888) तसेच त्यांची सत्यता देखील पडताळून पाहू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -