ही आहे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

भारतातून आता हॉट्सअॅप कायमच बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत सरकराच्या परवानगी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

Mumbai
whatsapp
व्हॉटस्अॅप

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. सकाळच्या गुड मॉर्निंगपासून ते रात्रीच्या गुड नाईटपर्यंत दिवसभराच्या सर्व घडामोडी आपण व्हॉट्सअॅपवर शेअर करतो. हा व्हॉट्सअॅपच कायमचा बंद झाला तर, हे वाचून तुम्हालाही धक्का बसला ना. अहो भारतातून आता व्हॉट्सअॅप कायमच बंद होण्याच्या मार्गावर आहे. भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

वाचा – ‘फिंगरप्रिंट लॉक’मुळे व्हॉट्सअॅप चॅट राहणार सुरक्षित

प्रमुखांनी केली चिंता व्यक्त

भारतात व्हॉट्सअपचे २० कोटी यूजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभर एकूण १.५ अब्ज यूजर्स आहेत. संदेशाचा माग घेणे म्हणजेच त्याच्या स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला असून तोच चिंतेचा विषय असल्याचे व्हॉट्सअप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटले आहे. तर फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. याचा अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच संदेश वाचू शकतात. व्हॉट्सअपलाही ते संदेश वाचता येत नाहीत.

वाचा – अँड्रॉइड मोबाइलनंतर व्हॉट्सअॅप वेबवरही आता ‘पिक्चर-इन-पिक्चर’

भारतील सोशल मीडियासंबंधीत कंपन्यांना सरकारद्वारे काही नियम लागू झाल्यास भविष्यात व्हॉट्सअॅप भारतातून हद्दपार होऊ शकतो. यासंबंधीची माहिती बुधवारी देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here