घरटेक-वेकतुम्हाला Whats App वरील पर्सनल चॅट लपवायचेत? मग 'हे' App वापरा!

तुम्हाला Whats App वरील पर्सनल चॅट लपवायचेत? मग ‘हे’ App वापरा!

Subscribe

WhatsApp हे आता अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर WhatsApp न बघता कामाला सुरुवात करणे म्हणजे काही तरी चुकल्या चुकल्या सारखे होते. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, खास व्यक्तीशी बोलण्यासाठी, आपल्या भावना शेअर करण्यासाठी WhatsApp बेस्ट समजले जाते. अनेक जण आपल्या पर्सनल आयुष्यातील गोष्टी WhatsApp च्या माध्यमातून इतरांना शेअर करत असतात. परंतु आपल्या पर्सनल चॅट कोणी वाचू नये यासाठी आपण नेहमी दक्ष असतो. परंतु तरीही कोणी आपल्या पर्सनल चॅट वाचल्या तर ते आपल्याला सहन होत नाही. परंतु आपल्या पर्सनल चॅट कोणी वाचू नये यासाठी त्या चॅट लपवण्यासाठी  एक नवा लॉक App प्ले स्टोरवर सुरु झाला आहे. या App मुळे तुमच्या WhatsApp वरील पर्सनल चॅट सुरक्षित करता येणार आहे. या App च्या माध्यमातून तुमच्या WhatsApp वरील एखाद्या विशिष्ट चॅटला आता लॉक लावता येणार आहे.

हे App कसे सुरु कराल ?

यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून WhatsApp Chat Locker या नावाचे ऍप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये पासवर्ड टाकून तुम्ही कोणत्याही एका किंवा अधिक लोकांच्या चॅट्सना लॉक करू शकता. हे अ‍ॅप कसे काम करतं ते जाणून घेऊ. ऍपमध्ये आपल्याला पासवर्ड सेट करण्याचा पर्याय मिळेल. आता तुम्ही त्यात आवडता पासवर्ड सेट करा. आता दुसऱ्या पेजच्याखाली आपल्याला + चे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. आता नवीन पेजवरील Lock Whatsapp Chats वर टॅप करा. आपल्याला पासवर्ड प्रोटेक्शनचा मॅसेज मिळेल. त्यामध्ये ओके क्लिक करा. आता फोन सेटिंग्जच्या Accessibility पर्यायावर क्लिक करा. पुन्हा ऍपवर जा आणि + आयकॉनवर क्लिक करा. आणि Lock Whatsapp Chats टॅप करा. आता आपल्याला एक नवीन मॅसेज मिळेल. त्याला OK करा. तुम्ही OK करताच तुमचा WhatsApp ओपन होईल. आता आपण ज्या संपर्कास आपल्या व्हाट्सएपमध्ये लॉक करू इच्छित आहात त्या संपर्कावर टॅप करा. आपणास Conversation लॉकचा संदेश मिळेल. आता आपल्या चॅट्सना लॉक केले आहे, जे दुसरे कोणीही उघडू शकणार नाहीये. या चॅट्सना आता अनलॉक करण्यासाठी, ऍपवर जाऊन पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. आपण लॉक केलेल्या चॅटचे नाव दिसेल. आपण त्यावर टॅप करताच आपल्याला एक अनलॉक संदेश मिळेल. त्यावर OK करा. आता OK वर टॅप केल्यास चॅट्स अनलॉक होतील. आता कोणीही ते पाहू शकते. अशा प्रकारे तुम्ही WhatsApp वरील पर्सनल चॅट सुरक्षित ठेऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -