व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर; अॅडमिन ‘फुल अधिकारी’!

व्हाट्सअॅपने नुकतेच एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरमध्ये मेसेज पाठवण्याचा अधिकार कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही हे आता अॅडमिनला ठरवता येणार आहे.

Mumbai
whatsapp image
(फोटो प्रातिनिधिक आहे)

‘बिन पगारी, फुल अधिकारी’ अशी ओळख असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनच्या अधिकारात आता वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच एक नवीन फीचर आणले असून ग्रुपमध्ये मेसेज पाठवण्याचा अधिकार कोणाला द्यायचा किंवा कोणता मेसेज ग्रुपवर टाकण्यासाठी परवानगी द्यायची हे आता अॅडमिनला ठरवता येणार आहे. हे फीचर सध्या अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

अॅडमिन ठेवणार नियंत्रण

जगभरात १.५ अब्ज लोक एकमेकांशी संपर्क करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. आपल्या मित्रमैत्रिणींशी, घरातल्या लोकांशी एकत्र संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण कधी कधी या ग्रुप्समध्ये सतत येणारे फॉरवर्ड मेसेज, जाहिराती, अफवांमुळे विनाकारण इतर सदस्यांना त्रास होतो. मात्र काही वैयक्तिक आणि सामाजिक कारणांमुळे अशा लोकांना आपण ग्रुप मधून काढू शकत नाही किंवा आपण ग्रुप सोडू शकत नाही. पण आता याच सर्व उपद्रवी गोष्टींवर अॅडमिन नियंत्रण ठेऊ शकणार आहे.

कसे वापराल नवीन फीचर?

जर तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल, तर हे नवीन फीचर वापरण्याकरता तुमच्या ग्रुपच्या नावावर क्लिक करा. तिथे तुम्हाला ग्रुप सेटिंग मेन्यू दिसेल. त्यांनतर ग्रुप सेटिंगवर क्लिक केल्यानंतर मेसेजे सेंड करा आणि नंतर ओन्ली अॅडमिन्सवर क्लिक करा.


first step
step 2
step 3

 

ग्रुप अॅडमिनवर होती टांगती तलवार!

व्हॉट्सअॅप ग्रुप्सचा वापर अनेकदा चुकीच्या गोष्टी, अफवा किंवा राजकीय प्रसिद्धीसाठी केला जातो. व्हॉट्सअॅप ग्रुपवरच्या मेसेजेसमुळे तणावपूर्ण वातावरण होऊन प्रसंगी हिंसक कारवाया झाल्याचंही काही घटनांवरून समोर आलं आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई करून ग्रुप अॅडमिनलाच दोषी धरलं होतं. मात्र, आता या नव्या फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला ग्रुपवर पडणाऱ्या अनावश्यक आणि संवेदनशील मेसेजेसवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here