घरटेक-वेकआता WhatsApp वरुनही पाठवता येणार पैसे; अशी आहे प्रक्रिया

आता WhatsApp वरुनही पाठवता येणार पैसे; अशी आहे प्रक्रिया

Subscribe

फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग App WhatsApp ला भारतात पेमेंट सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता WhatsApp वरुनही पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) WhatsApp Pay मंजूर केले आहे. पण एक अट घातली आहे. हे WhatsApp Pay केवळ दोन कोटी लोकांनाच वापरता येणार आहे. भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या ४० कोटीहून अधिक आहे. WhatsApp Pay ला मान्यता मिळाल्यानंतर फोनपे, गुगल पे सारख्या यूपीआय Appची चिंता वाढणार आहे, कारण WhatsApp पेमेंटसाठी दुसरे App वापरावे लागणार नाही आहे.

WhatsApp फक्त सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची वाट पाहत होता, कारण कंपनी गेल्या दोन वर्षांपासून WhatsApp Pay ची भारतात तपासणी करीत आहे. बीटा आवृत्तीवर हजारो वापरकर्ते आधीपासूनच WhatsApp Pay वापरत आहेत. अशा परिस्थितीत ही कंपनी लवकरच WhatsApp Pay भारतात जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. नवीन अपडेटनंतर, आपल्याला अन्य यूपीआय अॅपप्रमाणे यूपीआय पिन तयार करावा लागेल आणि त्यानंतर पेमेंट करण्यास सक्षम असू.

- Advertisement -

भारतात WhatsApp Pay सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या WhatsApp मध्ये पेमेंटचा पर्याय असेल, तर त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर WhatsApp अपडेट करून हा पर्याय बघता येणार आहे. WhatsApp Pay चा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणे अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPI ला सर्पोट करणार हवे. WhatsApp Pay पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे. WhatsApp ने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबतही करार केला आहे. यात ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank यांचा समावेश आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -