घरटेक-वेकतुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव 'असे' तर नाही ना...?

तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव ‘असे’ तर नाही ना…?

Subscribe

आक्षेपार्ह नावं असलेल्या ग्रुपमध्ये असाल तर व्हॉट्सअॅपकडून तुमच्यावर बंदी घालण्यात येईल. त्या आक्षेपार्ह नावं असलेल्या ग्रुप मेसेजिंगवर देखील बंदी घालण्यात येणार आहे. तसंच त्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर व्हॉट्सअॅप बंदी घातली जाणार आहे. या व्हॉट्सअॅप बंदीची पहिल्या घटनाबाबत अहवाल रेड्डिट यूझर मॉव्हे ११ ने नोंदविला आहे. त्याने असं म्हटलं की, जेव्हा विद्यापिठाच्या ग्रुपचे नाव ‘चिल्ड्रन पोर्नोग्राफी’ असं बदलण्यात आलं. तेव्हा या ग्रुपच्या सर्व सदस्यांना कोणतीही सूचना न देता त्याच्यावर व्हॉट्अॅप बंदी घातली गेली. तसंच एका सदस्याला व्हॉट्सअॅपकडून नियमांचे उल्लंघन केल्याचा मेसेज आला.

बंदी घातलेल्या त्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट एका आठवड्यानंतर चालू केले. तसंच अजून काही व्हॉट्सअॅप युझरने त्याच्याबाबत देखील असं घडल्याची माहिती दिली. एका ५० सदस्य असलेल्या ग्रुपने नावं ‘डिसग्सटींग’ असं ठेवलं. त्या ग्रुपने हे नाव दुपारी बदललं आणि त्या रात्री ग्रुपमधील सर्व सदस्यांच्यावर व्हॉट्सअॅप बंदी घातली गेली. त्या सर्व सदस्यांचे २७ दिवसांनंतर व्हॉट्सअॅप चालू करण्यात आले.

- Advertisement -

व्हॉट्सअॅप हे खासगी मेसेज करण्याचे अॅप असल्यामुळे या ग्रुपसाठी बंदी घालण्याचीबाब आश्चर्याची होती. जे युझर अनधिकृत अॅपचा वापर करत आहे त्याच्यावर देखील व्हॉट्सअॅपने तात्पुरती बंदी घाल्याची नोटीस दिली आहे. तसंच जे व्हॉट्सअॅपने दिलेल्या नियमाचे उल्लघंन करत आहेत त्या खात्यावर देखील बंदी घालत आहे. मात्र बहुतेक व्हॉट्सअॅप हे बिझिनेस अकाऊंटशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही देखील आक्षेपार्ह ग्रुपचे नावं ठेऊ नका आणि कोणत्याही आक्षेपार्ह ग्रुपमध्ये सामिल होऊ नका.


हेही वाचा – Ayodhya Verdict : व्हॉट्सअॅप ग्रुप झाले सतर्क आणि केली ‘ही’ गोष्ट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -