घरटेक-वेकआता WhatsApp द्वारे करता येणार Shopping; जाणून घ्या नवं फीचर

आता WhatsApp द्वारे करता येणार Shopping; जाणून घ्या नवं फीचर

Subscribe

व्यवसायांसाठी हे फिचर उपयोगी ठरू शकते

सोशल मीडिया अॅप्लिकेशनपैकी WhatsApp हे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप्लिकेशन आहे. गेल्या काही दिवसांपासून WhatsApp मध्ये नव-नवे फीचर्स युजर्ससाठी आणत आहेत. दरम्यान WhatsApp युजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता WhatsApp द्वारे शॉपिंग करणं शक्य होणार आहे. कारण आता या अॅपमध्ये शॉपिंग बटण अॅड करण्यात येणार असून कंपनीने याबाबत म्हटले आहे की, व्यवसायांसाठी हे फिचर उपयोगी ठरू शकते. WhatsApp च्या या नवीन फीचरअंतर्गत यूजर्सना business whatsapp account च्या शेजारी शॉपिंग बटण दिसेल. हे बटण स्टोर आयकॉनप्रमाणे आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नुसार दररोज business whatsapp account मध्ये 175 दशलक्ष लोक मेसेज करतात. कंपनीने असेही म्हटले आहे की, दररोज 40 दशलक्ष युजर्स WhatsApp वर व्यवसायाची कॅटलॉग पाहतात. हे युजर्स नव्या फीचरचा अधिक वापर करतील. WhatsApp शॉपिंग बटणाचा वापर करण्यासाठी तुम्हाला WhatsApp च्या कोणत्याही business whatsapp account वर जावे लागेल. हे अकाऊंट कोणाचेही असू शकते. ज्यांच्याकडून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट अथवा सर्व्हिस (सेवा) खरेदी केली असेल किंवा त्यासंबंधी मेसेज पाठवला-रिसिव्ह केला असेल, त्यांचे अकाऊंट बिझनेस अकाऊंट असू शकते.

- Advertisement -

चॅटिंगच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी शक्य

बिझनेस अकाऊंटमध्ये तुम्हाला शॉपिंग आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर समोरील अकाऊंटद्वारे विक्री होत असलेल्या प्रोडक्टची यादी दिसेल. त्यानंतर केवळ चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही वस्तूंची खरेदी करु शकता. WhatsApp चा सध्या सुपर अॅप बनण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. तर नुकतंच WhatsApp ने त्यांचे WhatsApp pay हे फीचर लाँच केले आहे. फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग App WhatsApp ला भारतात पेमेंट सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता WhatsApp वरुनही पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) WhatsApp Pay मंजूर केले आहे


आता WhatsApp वरुनही पाठवता येणार पैसे; अशी आहे प्रक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -