घरटेक-वेकव्हॉट्सअॅपने लाँच केलेत पाच नवीन फीचर्स

व्हॉट्सअॅपने लाँच केलेत पाच नवीन फीचर्स

Subscribe

प्रत्येकवेळी आपल्या युजर्सला काही नवे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्हॉट्सअॅपने आणखी पाच फीचर्स लाँच केले आहेत. फेसबुककडे मालकीहक्क असलेल्या व्हॉट्सअॅपने नुकत्याच घेतलेल्या एफ ८ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या फीचर्सचा मुख्यतः वापर व्हॉट्सअॅप आणि फेसबुक बिझनेससाठी केला जाणार आहे. या फीचर्ससाठी ‘युरोपियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेगुलेशन’ ची मदत घेतली जाईल.

जाणून घ्या काय आहेत नवे फीचर्स –

- Advertisement -

१. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग –
हॉट्सअॅपवर ग्रुप चॅटिंग आपण नेहेमीच करतो. हॉट्सअॅपने समोरच्याला ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करु शकतो. मात्र हॉट्सअॅपवरील व्हिडिओ कॉलिंग आता ग्रुप सोबतही करता येणार आहे. व्हिडिओ कॉल दरम्यान एकाच स्क्रिनवर ग्रुपमधील सर्व लोकांना बघता येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येईल.

२. अकाऊंट युजर्सची माहिती –
व्हॉट्सअॅपवर युजर्सबद्दल जर काही माहिती हवी असल्यास त्याला अकाऊंट बद्दलची माहिती मिळवण्याची विनंती करु शकतो. ही विनंती अकाऊंट युजर्सने स्वीकारल्यास संबधीत माहिती ही विनंती करणाऱ्याला मिळू शकते. या माहितीमध्ये युजर्सचे नाव, फोनक्रमांक, फोनचा मॉडेल क्रमांक, लास्ट सिन या प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

३. ग्रुपवरील मजकूरांना लावू शकता प्रतिबंध-
या फीचरमुळे ग्रुपवर येणाऱ्या नको असलेल्या मजकूरावर युजर प्रतिबंध लावू शकतो. हे फीचर फक्त ग्रुप अॅडमिनसाठीच उपलब्ध राहील. ग्रुपमध्ये येणारे मॅसेजला रिप्लाय फक्त अॅडमिनच करु शकेल. अन्य ग्रुप सदस्य हा मॅसेजफक्त वाचू शकतील. ग्रुपवर शेअर होणारे व्हिडिओ, फोटो, जीआयएफ फाईल्स, डॉक फाईल किंवा व्हाईस मॅसेज प्रसारित करण्याचा निर्णय फक्त अॅडमिनच घेऊ शकेल.

४. फेसबुक पोस्ट शेअर-
या फीचरद्वारे फेसबुकवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट व्हॉट्सअॅपवरही शेअर करता येतील. यासाठी फेसबुकची वेगळी परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. फेसबुक पोस्ट शेअर करण्यासाठी युजर्सला फेसबुकवर केलेली पोस्ट शेअर करावी लागेल. यानंतर आलेल्या तीन ऑप्शनमध्ये ‘सेंड इन व्हॉट्सअॅप’ हे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. पोस्ट केलेली लिंक हट्सअॅपवरही ( व्हॉट्सअॅपवरही ) शेअर करु शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -