विंडोज ७ चे कॉम्प्युटर होणार बंद, ‘हे’ आहे कारण

विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टिम असलेले कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. विंडोजला मायक्रोसॉफ्ट मिळणारा सपोर्ट बंद होणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Mumbai
windows-7
प्रातिनिधिक फोटो

जर तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये विंडोज ७ ही ऑपरेटिंग सिस्टम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. येत्या काही महिन्यात विडोंज ७ वाले कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बंद होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर ती बदलण्याची वेळ आली आहे. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. विंडोज ७ ला मिळणारा सपोर्ट बंद करणार असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे येत्या काळात विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टिम कालबाह्य होणार आहे. पुढील वर्षी १४ जानेवारी २०२० पासून विंडोज ७ बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

काय होणार नेमेके बंद

विंडोज ७ हे कालबाह्य होणार आहे. याचाच अर्थ कंपनीने दिलेल्या वेळेनंतर कोणीही विंडोज ७ ला अपडेट करु शकणार नाही. यामध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश असणार आहे. या दोन्ही गोष्टींमुळे कॉम्प्युटरमधील ओएस सुरक्षित राहाते. मायक्रोसॉफ्टने गेल्यावर्षी जून महिन्यात विंडोज ७ चा फोरम सपोर्ट बंद केला होता. ७ जुलै २००९ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ युजर्स साठी सुरु केले होते. मात्र कालांतराने नवीन ओएस आल्यानंतर आता हे व्हर्जन जुने झाले आहे. त्याचे संवर्धन करण्याऐवजी ते बंद करण्याचा पर्याय कंपनीने स्विकारला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here