घरटेक-वेकशाओमीचा नवा ए२ भारतीय बाजारात दाखल

शाओमीचा नवा ए२ भारतीय बाजारात दाखल

Subscribe

शाओमी एमआय ए२ भारतीय बाजारात दाखल. काय आणि कसे असतील याचे फिचर्स आणि किती किमतीला मिळणार हा फोन? खास तुमच्यासाठी ही माहिती

चीनी मोबाईल कंपनी शाओमीनं आपला नवा फोन शाओमी एमआय ए२ भारतीय बाजारात दाखल केला आहे. पहिला फोन १६ ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध होणार असून याचं प्रीबुकिंग ९ ऑगस्टला करण्यात येणार आहे. या फोनचा स्टॉक लिमिटेड असून प्री – ऑर्डर आणि फ्लॅश सेल दोन्हीमध्येही फोनची किंमत तीच राहणार आहे. कंपनीचा हा दुसरा अँड्रॉईड वन फोन आहे. शाओमीचे नेहमीच आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आणत असते. यावेळी ए२ हा नवा फोन कंपनी घेऊन आली आहे.

काय आहेत फिचर्स?

शाओमी एमआय ए२ ची किंमत भारतामध्ये १६,९९९ इतकी असेल. यामध्ये ४ जी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची सुविधा आहे. १२८ जी स्टोरेज आणि ६ जीबी रॅमवाला फोन नंतर बाजारामध्ये आणण्यात येईल. हा फोन ड्युएल सिम असून यामध्ये ८.१ ओरियो ओएस आहे. तर याचा डिस्प्ले ५.९९ इंचाचा असून, संपूर्ण एचडी आहे. आस्पेक्ट रेशिया १८:९ इतका आहे. स्क्रीन २.५ डी कव्हर्ड गोरिला ग्लास ५ ची आहे. यामध्ये पॉवरफुल ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ६६० एओसी २.२ गीगा हर्ट्सचा प्रोसेसर लावण्यात आला आहे.

- Advertisement -

कसा बुक करता येईल फोन?

जितका स्टॉक उपलब्ध आहे तितकीच प्री बुकिंग सध्या कंपनी घेणार आहे. प्री बुकिंगकरिता कोणतीही शेवटची तारीख घोषित करण्यात आलेली नाही. तर कंपनीनं अमेझॉन डॉट कॉमतर्फे शिपमेंट सुरु केली आहे. १२ ऑगस्टपासून ही डिलिव्हरी सुरु होणार असून १६ ऑगस्टपूर्वी खरेदी करणाऱ्यांना मिळेल. मात्र प्री बुकिंग करताना सर्व रक्कम ग्राहकांनी भरणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -