घरटेक-वेकस्मार्टफोन पाठोपाठ शाओमीचा 'स्मार्ट बल्ब' बाजारात

स्मार्टफोन पाठोपाठ शाओमीचा ‘स्मार्ट बल्ब’ बाजारात

Subscribe

शाओमीने भारतात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान Redmi Y3 आणि Redmi 7 हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. तर यासोबतच कंपनीने Mi LED Smart Bulb ही लाँच केले आहे.

शाओमी ही एक चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी आहे. स्वस्त आणि मस्त अशी ओळख असणाऱ्या शाओमी कंपनीने भारतात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान Redmi Y3 आणि Redmi 7 हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. शाओमी कंपनी स्मार्टफोन शिवाय ‘स्मार्ट शूज’, तसेच ‘टू डिसप्ले विंडो टिव्ही’, असे अनोखे उत्पादन बाजारात आणली आहेत. तर आता Redmi Y3 आणि Redmi 7 या स्मार्टफोन सोबत ‘Mi LED Smart Bulb’ भारतामध्ये लाँच केला आहे. शाओमी कंपनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनच नाही, तर त्यांच्या इतरही उत्पादन लाँच करत आहेत. हा ‘स्मार्ट बल्ब’ कंपनी ऍमेझॉन, अॅलेक्सा, व्हॉइस सहाय्यक आणि गुगल सहाय्यकांना समर्थन देतो.

‘स्मार्ट बल्ब’ बद्दल असा केला दावा

तसेच Mi LED Smart Bulb चे मुख्य आकर्षण हे आहे की, हा बल्ब १.६ करोड रंग बदलू शकणार आहे. तसेच कंपनी असा दावा करते आहे की, ११ वर्षापर्यंत हा बल्ब चांगल्या रित्या चालू शकतो. तसेच हा ‘स्मार्ट बल्ब’ची खरेदी ग्राहक Mi Home app द्वारे करू शकणार आहे. तसेच Mi.com वरुनही २६ एप्रिलपासून ‘स्मार्ट बल्ब’ खरेदी करू शकणार आहेत. मात्र, या ‘स्मार्ट बल्ब’ची किंमत कंपनीने जाहिर केलेली नाही आहे. विक्रीसाठी काढले जाईल तेव्हा या स्मार्ट बल्बची किंमत सांगण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसेच या ‘स्मार्ट बल्ब’ला Mi Home app च्या द्वारे नियंत्रात ठेऊ शकतात. अॅपवरून ‘स्मार्ट बल्ब’ चालू-बंद करु शकतो. तसेच ब्राइटनेस आणि रंग ही बदलता येणार आहेत.

- Advertisement -

या तारखेपासून येणार सेलमध्ये

दरम्यान, शाओमी कंपनीने याच कार्यक्रमात Redmi Y3 आणि Redmi 7 हे स्मार्टफोन लाँच केले. कंपनीने Redmi Y3 हा स्मार्टफोन दोन वेगळया प्रकारामध्ये लाँच केले आहे. एक ३ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम असे आहे. त्यामध्ये ३ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ तर ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोनची किंमत ११,९९९ इतकी आहे. तसेच Redmi 7 या स्मार्टफोनलाही दोन प्रकारात लाँच केले आहे. एक २ जीबी रॅम आणि दुसरी ३ जीबी रॅममध्ये असे लाँच करण्यात आले आहेत. तसेच २ जीबी रॅम असणाऱ्या स्मार्टफोनची किमत ७,९९९ तर ३ जीबी रॅम असणाऱ्या स्मार्टफोनची किमत ८,९९९ रपये एवढी आहे. तसेच Redmi Y3 या स्मार्टफोनचा सेल ३० एप्रिलला दुपारी १२ वाजल्यापासून चालू होणार आहे. तर Redmi 7 हा स्मार्टफोनचा सेल २९ एप्रिलला दुपारी १२ वाजल्यापासून चालू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -