Redmi 7A मध्ये आता महागड्या फोनचे फिचर्स

ग्राहक या स्मार्टफोनला ११ जुलैपासून फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi Home वरून खरेदी करू शकतात

Mumbai

भारतात Xiaomi कंपनीने नुकताच Redmi 7A हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे कंपनीने दोन वेरिएंट तयार केले आहे. यामध्ये 2GB रॅम +16GB स्टोरेज असणारे वेरिएंटची किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे तर, 2GB रॅम +32GB स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत ६ हजार १९९ रुपये आहे.

फोन खरेदी केल्यावर मिळणार आकर्षक ऑफऱ

  • ग्राहक या स्मार्टफोनला ११ जुलैपासून फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi Home वरून खरेदी करू शकतात.
  • Xiaomi कंपनीच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना आकर्षक ऑफर दिली आहे.
  • जुलै महिन्यात Redmi 7A स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला २०० रूपयांची सवलत मिळणार आहे.

Redmi 7A कनेक्टिविटी

Redmi 7A स्मार्टफोनमधील ड्यूल नॅनो-सीम स्लॉट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३.५ mm चे हेडफोन जॅक देण्यात आले असून हा फोन ब्लूटूथ ५.०ला सपोर्ट करते.