घरटेक-वेकभारतात परवडणाऱ्या किंमतीत Redmi Earbuds S झाले लाँच

भारतात परवडणाऱ्या किंमतीत Redmi Earbuds S झाले लाँच

Subscribe

Redmi Earbuds S चे फिचर्स काय आहेत ते जाणून घ्या.

ट्रू वायरलेस इअरबड्सची मागणी बाजारात सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेता स्मार्टफोन कंपनी इअरबड्वर लक्ष केंद्रित करत आहेत. आता Realme, OPPO आणि OnePlus नंतर Xiaomi चा सब-ब्रँड Redmi ने अलीकडेत भारतातात पहिला ट्रू वायरलेस इअरबड्स Redmi Earbuds S लाँच केला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi AirBuds S चा रिब्रँडेड आवृत्ती आहे. कंपनीने Redmi Earbuds S भारतात परवडणाऱ्या किंमतीसह लाँच केला आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

Redmi Earbuds S ची किंमत १ हजार ७९९ रुपये आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.in तसेच कंपनीच्या ई-स्टोअर वरून हे इअरबड्स तुम्ही विकत घेऊ शकता.

- Advertisement -

Redmi Earbuds S चे फिचर्स

Redmi Earbuds S या डिव्हाइसमध्ये SBC codec चा वापर केला आहे. तसेच यामध्ये low-latency गेमिंग मोड फीचरचा सपोर्ट आहे. हे ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह आहे. कंपनीचा असा दावा आहे की, यामध्ये वापरलेली बॅटरी एका चार्जवर १२ तासांचा बॅकअप प्रदान करू शकते.

Redmi Earbuds S ची भारतातील बाजारात अगोदर पासून असलेल्या Realme Buds Air Neo वायरलेस इअरबड्सशी टक्कर होणार आहे. Realme Buds Air Neo हे नुकतेच भारतात लाँच करण्यात आले आहे. त्याची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. यामध्ये ऑडियो बूस्टसाठी 13mm डायनॅमिक बास बूस्ट ड्राइव्हर दिले आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ऑटो कनेक्शन मोडची सुविधा दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘Realme Buds Air Neo’ भारतात झाले लाँच, जाणून घ्या फिचर्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -