Redmi Y3 च्या ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनवर आकर्षक सुट; विक्री सुरु

या स्मार्टफोनला अॅमेझॉन तसेच, MI होम आणि Xiaomi च्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येणार

Mumbai

भारतात ६ जूनला रात्री १२ वाजेपासून ओपन सेल सुरू झाला आहे. Xiaomi Redmi Y3 या स्मार्टफोनला Xiaomi कंपनीने एप्रिलमध्ये लाँच केले होते. या स्मार्टफोनला अॅमेझॉन तसेच, MI होम आणि Xiaomi च्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

 

हे आहेत वैशिष्ट्य

  • Redmi Y3 स्मार्टफोनमध्ये ६.२६ इंचीचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या स्मार्ट फोनच्या कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे.
  • फोटोग्राफीकरिता ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह ऑटो HDR देण्यात आले आहे.
  • ४००० mAh च्या बॅटरीसोबत यूजर्स या कॅमेऱ्याद्वारे HD सेल्फी व्हिडिओ ही रेकॉर्ड करू शकतो.
  • फोनच्या मागच्य़ा बाजूस १२ मेगापिक्सलचा कॅमेरा असून २ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.
    या फोनची बॅटरी दोन दिवस टिकू शकते.
  • स्मार्टफोनच्य़ा रिअर पॅनलवर माइक्रो लाइन्ससोबत Aura Prism डिझाईन देण्यात आले आहे.

अशी आहे किंमत

Redmi Y3 ची सुरूवातची किंमत ९ हजार ९९९ रूपये आहे. या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहे.

३GB रॅम+ ३२GB स्टोरेज आणि ४GB रॅम+ ६४GB स्टोरेज. ३२ GB आणि ३२GB स्टोरेज असणारा फोन ९ हजार ९९९ रूपये तर ४GB रॅम+ ६४GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रूपये इतकी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here