घरटेक-वेकशाओमीचं नवं अपडेट, नको त्या जाहिरातींपासून सुटका!

शाओमीचं नवं अपडेट, नको त्या जाहिरातींपासून सुटका!

Subscribe

स्मार्टफोनमधील जाहिरातीचं प्रमाण वाढलं असल्याची अनेक तक्रारी येतं होत्या.

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात खळबळं निर्माण केली आहे. भारतात स्मार्टफोन चाहत्यांनी शाओमी कंपनीला मोठी पसंती दाखवली आहे. परंतु शाओमीच्या स्मार्टफोनमधील जाहिरातींपासून युजर्स निराश झाले आहेत. या स्मार्टफोनमधील जाहिराती कशाप्रकारे थांबवता येतील ? यासाठी युजर्स प्रयत्न करत होते. हे लक्षात येताच, शाओमी कंपनीने जाहिराती कमी करायचे ठरवले. त्यासाठी नवीन अपडेट व्हर्जन आणलं आहे.

भारतात शाओमी स्मार्टफोन कंपनीनं चांगलीच प्रसद्धी मिळवली आहे. शाओमी स्मार्टफोन कंपनीमुळे बाजारातील इतर कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. शाओमीच्या स्मार्टफोन खरेदीत अधीक वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमधील जाहिरातीचं प्रमाण वाढलं असल्याची तक्रारी येतं होत्या. यासाठीच कंपनीनं त्यांच्या जाहिराती कमी केल्या आहेत. यासाठी युजर्सला त्याचा स्मार्टफोन अपडेट करावा लागणार आहे.

- Advertisement -

युजर्सची काय तक्रार होती ?

शाओमीच्या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्यांचा स्वतःचा इनबिल्ट ब्राऊजर आहे. या ब्राउजरच्या नोटिफिकेशन जास्त प्रमाणात दाखवल्या जातं असे. महत्वाचे म्हणजे, हा ब्राऊजर अनइन्स्टॉल करता येत नाही. या जाहिरातींपासून सुटका करण्यासाठी युजर्सला स्मार्टफोन अपडेट करावा लागणार आहे. तसेच एमआययूआय हे ब्राउजरमधील जाहिराती बंद करता येणार आहे. तसेच इतर जाहिरातीचं प्रमाण कमी होणार आहे. शाओमीचा पोको स्मार्टफोनच्या युजर्सने याची सर्वाधिक तक्रार केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -