चिनी कंपनी शाओमी ११ जूनला पहिला लॅपटॉप MI Notebook करणार लाँच

New Delhi
xiaomi to launch mi notebook in india on june 11
चिनी कंपनी शाओमी ११ जूनला पहिला लॅपटॉप MI Notebook करणार लाँच

एकीकडे भारतात चिनी उत्पादने खरेदी करू नये असे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे चिनी कंपनी शाओमी सतत भारतात नवीन उत्पादने आणत आहेत. चिनी कंपनी शाओमीने एक टीझर जारी केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, ११ जून रोजी कंपनी जागतिक पातळीवर Mi Notebook सीरिज लाँच करणार आहे. तसंच भारतात देखील Mi Notebook लाँच होणार आहे.

हे मॉडेल कोणत असेल याबाबत अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही. कंपनीने म्हटले आहे की, Mi Notebook इंडिया एक्सक्लुझिव्ह असेल आणि भारतातील या कंपनीचा पहिला नोटबुक असेल.

शाओमी इंडियाचे प्रमुखे मनु कुमार जैन यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, हा लॅपटॉप मेड इन इंडिया असेल. तो ११ जूनला लाँच केला जाईल. शाओमीने देखील सांगितले की, Mi Notebook सुरुवातील आंतरराष्ट्रीय बाजारात आयात केला जाईल आणि मग त्यानंतर मागणी वाढली की कंपनी भारतात तयार करण्याचा विचार करेल.

सुरुवातील कंपनी पातळ आणि हलके लॅपटॉपसह गेंमिग कॅटेगरीचे लॅपटॉप सेगमेंटवर लक्ष केंद्रित करीत आहे. कारण या दोन्ही कॅटेगरीमध्ये ग्राहकांची जास्त पसंती आहे. या लॅपटॉपची वैशिष्ट्ये काय असतील हे स्पष्ट झालेले नाही. परंतु कंपनी भारतात चांगल्या किंमतीसह लॅपटॉप लाँच करू शकते. सुरुवातीला लॅपटॉप सवलतीच्या दरात ऑफर दिल्या जातील.


हेही वाचा – फोनमधून चिनी अ‍ॅप्स काढणारे अॅप भारतात लोकप्रिय, १० लाख डाऊनलोड