Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच होणार लॉंच

Samsung आणि Huawei कंपनीने आपला फोल्डेबल फोन लॉंच केला होता. या दोन्ही कंपनीने लॉंच केलेल्या फोनची किंमत जास्त असल्याने त्याला स्पर्धा देण्यास Xiaomi आपला फोल्डेबल फोन लवकरच बाजारात लॉंच

Mumbai
Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन

२०१९ हे वर्ष स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी नव-नवीन तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन लॉंच करण्याचे आहे. या वर्षाच्या सुरूवातीला स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये फोल्डेबल स्मार्टफोनची एकच चर्चा होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात Samsung आणि Huawei कंपनीने आपला फोल्डेबल फोन लॉंच केला होता. या दोन्ही कंपनीने लॉंच केलेल्या फोनची किंमत जास्त असल्याने त्याला स्पर्धा देण्यास Xiaomi आपला फोल्डेबल फोन लवकरच बाजारात लॉंच करेल असे यूजर्ससह ग्राहकांना वाटत आहे.

Xiaomi कंपनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अधिक सतर्क आहेत. इतर स्मार्ट कंपनीच्या तुलनेत Xiaomi नेहमी आपल्या ग्राहकांना कमी किंमतीमध्ये सर्व फिचर उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. या दरम्यान Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोनचा एक टिझर प्रदर्शित झाला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या या टिझरमुळे एक गोष्ट पक्की झाली आहे की, कंपनी आपला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉंच करणार आहे. १० सेकंदाच्या व्हिडिओमधून ग्राहकांना प्रात्याक्षिक बघायला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा फोन फ्लॅट तसेच फोल्ड करून देखील वापरता येणे शक्य आहे.

हा स्मार्ट फोन डबल फोल्ड करता येणार असून जेस्चर कंट्रोल हे फिचर आहे. Android 9 च्या आधारावर MIUI 9 देण्यात आले आहे. मोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनकरिता जेस्चर कंट्रोल हे फिचर आवश्यक आहे. कारण फोनचा डिस्प्ले, स्क्रिनचा आकार मोठा असल्याने एका हाताने हा फोन हाताळण्यास शक्य होत नाही.

टिझरने ग्राहकांमध्ये उत्सुकता

Xiaomiने आपल्या फोल्डेबल स्मार्ट फोनचे काम करण्यास सुरूवात केली आहे त्यामुळे लवकरच हा फोल्डेबल फोन बाजारात उपलब्ध होईल. या फोनचा टिझर पाहून ग्राहकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. Xiaomiचा फोल्डेबल स्मार्ट फोनची किंमत ७४००० रुपयांच्या आसपास लॉंच करण्यात येईल. Samsung Galaxy Fold ची किंमत १,४०,००० रूपये तर, Huawei के फोल्डेबल फोन Mate X ची किंमत भारतात साधारण १,८५,००० असेल.

अशा फोल्डिंग फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहितीचा खुलासा झालेला नाही. Xiaomi हा फोल्डेबल स्मार्ट फोन जुन महिन्याआधी लॉंच करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here