‘या’ स्पीकर्सच्या माध्यमातून करा Voice call

शाओमी कंपनीने लाँच केलेल्या या ब्लूटूथ स्पीकर्सच्या माध्यमातून, तुम्ही व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉलही करु शकणार आहात.

Mumbai
Xiaomi 2.0 Bluetooth Speakers
शाओमीचे ब्लूटूथ स्पीकर (फोटो सौजन्य- NDTV Gadgets)
गॅजेट्स विश्वामध्ये नेहमीच नवनवीन शोध लागत असतात. जगभरातील गॅजेट निर्मिती करणाऱ्या कंपन्या अत्याधुनिक आणि लोकोपयोगी गॅजेट्सची वारंवार निर्मिती करत असतात. याच धर्तीवर शाओमी कंपनीने म्युझिक प्रेमींसाठी नवीन 2.0 ब्लूटूथ स्पीकरची निर्मीती केली आहे. शाओमी कंपनीने नुकतेच हे स्पीकर आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केले आहेत. शाओमीचे हे ब्लूटूथ स्पीकर्स खास कॉम्प्युटर आणि नोटबुकच्या अनुशंगाने तयार करण्यात आले आहेत. सध्या या स्पीकर्सची किंमत ३९९ चीनी युवान म्हणजेच साधारण ४ हजार रुपये इतकी आहे. मात्र, भारतीय मार्केटमध्ये हे स्पिकर्स विक्रीसाठी अद्याप उपलब्ध नाहीयेत. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, लवकरच भारतासह अन्य देशांमध्ये शाओमीचे हे ब्लूटूथ स्पीकर लाँच होणार असून, ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून  ते ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. जाणून घेऊया शाओमीच्या या नवीन ब्लूटूथ स्पिकर्सची ठळक वैशिष्ट्ये –
हेही वाचा :  रेसिंग टायर की म्युझिक स्पीकर!
शाओमीच्या ब्लूटूथ स्पिकरची खासियत :
  • स्पीकर्समध्ये मायक्रोफोन आणि कॅमेराची विशेष सुविधा
  • त्यामुळे स्पीकरच्या माध्यमातून व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल करता येणार
  • 4.2 व्हर्जनने परिपूर्ण ब्लूटूथ स्पीकर्स
  • MP3, AAC, APTX आणि APTX-LL  या फॉरमॅट मधील फाईल्स प्ले होऊ शकणार
  • सर्वात महत्वाचं ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी. त्यामुळे स्पीकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सहज शक्य