घरटेक-वेकआता व्हॉट्सअॅपवर दिसणार यूट्युब, इंस्टाग्रामचे व्हिडीओ

आता व्हॉट्सअॅपवर दिसणार यूट्युब, इंस्टाग्रामचे व्हिडीओ

Subscribe

व्हॉट्सअॅपने आता एक नवीन फीचर्स लाँच केले आहे. या नवीन फीचर्समध्ये आता यूट्युब आणि इंस्टाग्रामचे व्हिडीओ पाहता येणार आहे. या फीचर्सचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे.

युजर्सला काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्हॉट्सअॅपने आता एक नवीन फिचर्स लाँच केले आहे. यामध्ये आता व्हॉट्सअॅपवरुन यूट्युब, इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहता येणार आहेत. या नव्या फिसर्सचे काम अंतिम टप्प्यात असून हे व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये हे फिचर वापरता येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स

व्हॉट्सअॅपचे मोठ्या संख्येने युजर्स आहेत. या युजर्सच्या वापरानुसार आपल्या अॅपमध्ये सुधारणा करत व्हॉट्सअॅप अनेक नवीन फिचर्स युजर्ससाठी डेव्हलप केले आहेत. या फिचर्सला ‘पिक्चर इन पिक्चर’ (पिप) असे म्हटले जाणार आहे. आता या नवीन फिचर्समध्ये यूट्युब आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहता येणार आहे. हे फिचर्स या आधी आयफोन युजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे. आता अँड्रॉइड युजर्ससाठी देखील या फिचर्सचा वापर होणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप अँड्रॉइडच्या २.१८.२३४ या व्हर्जनमध्ये उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

काय आहे हे फिचर्स?

व्हॉट्सअॅपवर आता यूट्युब आणि इंस्टाग्रामच्या व्हिडिओची येणारी लिंक ओपन करुन तेथेच व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आपण लिंकवर क्लिक केल्यावर व्हॉट्सअॅप चॅटच्या विंडोवर एक छोटी विंडो खुली होणार असून त्यामध्ये तो व्हिडीओ प्ले होईल.

‘ग्रुप व्हिडिओ कॉलिंग’ नवीन फिचर्स

गेल्याच आठवड्यात हॉट्सअॅपने ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे एक नवीन फिचर्स युजर्सकरता आणले आहे. या फिचर्समध्ये हॉट्सअॅपवरील व्हिडिओ कॉलिंग आता ग्रुप सोबतही करता येणार आहे. या व्हिडिओ कॉल दरम्यान एकाच स्क्रिनवर ग्रुपमधील सर्व लोकांना बघता येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -