घरटेक-वेकभारतात बनणार iPhone; किंमत होणार कमी

भारतात बनणार iPhone; किंमत होणार कमी

Subscribe

आयफोनची निर्मिती भारतात सुरु झाल्यामुळे साहाजिकच भारतीय बाजारपेठेतील iPhones चे दर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगविख्यात अमेरिकन कंपनी Apple ची निर्मिती असलेल्या ‘iPhone’ ची जगभरात क्रेझ आहे. मात्र, आता चक्क भारतात आयफोनची निर्मिती केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. अॅपलचे 

‘या’ शहरात सुरु होणार निर्मिती

Apple ची सप्लायर कंपनी असलेल्या फॉक्सकॉन या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतात लवकरच आयफोन निर्मितीच्या प्लॅंटला सुरुवात होईल. याशिवाय चायनातील मॅन्युफॅक्चरिंग प्लँटही भारतात शिफ्ट करायची योजना आखली जात आहे.’ समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, फॉक्सकॉनचे वरिष्ठ अधिकारी आणि चेअरमन Terry Gou लवकरच भारतात येऊन यासंदर्भात चर्चा करणार आहेत. या रिपोर्टमधील माहितीनुसार, भारतात आधीपासूनच iPhone 6S आणि iPhone SE या फोनचं असेम्बलिंग केलं जातं. दरम्यान, भारतात सुरु होणारा हा मॅन्युफॅक्चरिंग प्लँट तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूरमध्ये सुरु केला जाऊ शकतो. याठिकाणी आधीपासूनच Apple कंपनीचे लोकल असेम्बलिंग युनिट आहे. इथेच हा नवा प्लँट सुरु केला जाऊ शकतो. Foxconn या कंपनीकडून फोन्सची निर्मिती केली जाणार आहे. 

भारतीयांसाठी फायदेशीर योजना

दरम्यान, apple कंपनीची ही योजना भारतीयांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे. भारतात सध्या मिळणाऱ्या हायएंड आयफोन्सची किंमत जवळपास १ लाख रुपये इतकी आहे. अॅपलचे सर्व फोन चीनमधून भारतात एक्सपोर्ट करण्यात येतात. त्यामुळे त्याची किंमत साहाजिकच जास्त असते. मात्र, फोन तयार करण्याचं काम भारतातच सुरु झाल्यास एक्पोर्टची किंमत घटणार आहे आणि पर्यायाने भारतात मिळणे आयफोन्सही स्वस्त होणार आहेत. याशिवाय भारतात सुरु होणाऱ्या आयफोन निर्मितीच्या या प्लँटमुळे देशात २५ हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची शक्यता एका रिपोर्टनुसार वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -