Tik Tok ला आता कायमचं विसरा; YouTube Shorts झालं भारतात लाँच

YouTube Shorts launched in india

Tik Tok बॅननंतर देशात अनेक शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. इंस्टाग्रामनंतर आता Youtube ने देखील असाच एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. यु ट्यूबने Youtube Shorts लाँच केलं असून इतर प्लॅटफॉर्मस् लाटक्कर देईल. Youtube Shorts मध्ये १५ सेकंदापर्यंत व्हिडीओ करता येणार आहे. सर्वात आधी भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध करुन देणार आहेत. याबाबतची माहिती Youtubeने अधिकृतरित्या दिली आहे.

देशात आगामी काळात Youtube Shorts बेटा स्वरूपात उपलब्ध होईल. काही काळ चाचणी घेतल्यानंतर, YouTube शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मचं मुख्य आवृत्ती बाजारात येईल. बेटा आवृत्तीमध्ये काही वैशिष्ट्ये समाविष्ट असतील. उर्वरित वैशिष्ट्ये मुख्य आवृत्तीमध्ये जोडली जातील.

Youtubeने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की ही उत्पादनाची प्रारंभिक आवृत्ती आहे. Youtube Shorts ला वापरकर्ते, निर्माते आणि कलाकार अदिक प्रभावी बनवतील, यासाठी आम्ही बेटा आवृत्तीमध्ये लाँच केलं असल्याचं Youtube ने म्हटलं आहे. Youtube Shorts हे Tik Tok सारखच आहे. Tik Tok सारखेच फीचर्स यामध्ये आहेत. त्यामुळे Tik Tok ला आता कायमचं विसरुन जा.