पती सोडून गेला, नोकरीही गेली; हताश होऊन तिने आपल्या बाळाचा केला त्याग

coronavirus 14 month old child dies corona virus jamnagar gujarat
१४ महिन्याच्या बाळाची कोरोनाशी झुंज संपली

पतीने सोडून दिल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात नोकरीही गमावलेल्या मातेने अवघ्या ४ दिवसाच्या मुलाचा त्याग केल्याचा धक्कादायक प्रकार कळव्यात उघडकीस आला आहे. कळवा पोलिसांनी काही तासांतच या मातेचा शोध घेऊन तिला अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळव्यातील खारेगाव येथील एका मोकळ्या मैदानात ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ दिवसाचे स्त्री जातीचे मुलं कळवा पोलिसांना मिळून आले होते. पोलिसांनी मुलं ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून मातेचा शोध घेतला असता खारेगाव परिसरात राहणाऱ्या २४ वर्षाच्या तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात ते मुलं तिचेच असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

या तरुणीने वर्षभरापूर्वी एका तरुणासोबत पळून जाऊन विवाह केला होता. मात्र काही महिन्यातच पतीने तिला सोडून दिले. काही महिन्याची गर्भवती असतांना ती खारेगाव येथे राहणाऱ्या आईकडे राहायला आली. एक खासगी ठिकाणी नोकरी करून ती स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेली. त्यात काही दिवसांपूर्वी ती प्रसूत झाली व तिला मुलगी झाली. मात्र पतीने सोडून दिल्यामुळे व कामधंदा नसल्यामुळे बाळाचा सांभाळ कसा करणार या विवंचनेत सापडलेल्या या मातेने मुलीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि ४ दिवसाच्या पोटच्या मुलीला तिने रात्रीच्या वेळी एका मोकळ्या मैदानात सोडून निघून गेली, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. मुलीचा त्याग केल्याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय मातेला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

हेही वाचा –

राज्यात १०,५५२ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू