ठाण्यात १० सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या!

Transfers
प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे पोलीस दलातील दहा एसीपींच्या (सहाय्यक पोलीस आयुक्त) बदल्या करण्यात आलेल्या असून त्यात बाहेरून आलेल्या एसीपींचा समावेश आहे. वागळे इस्टेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्याकडे ठाणे विशेष शाखा १ ची जवाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागेवर विशेष शाखा १ चे एसीपी जयंत बजबळे यांची बदली करण्यात आली आहे.

एसीपी (प्रशासन) दत्ता तोटेवाड यांना उल्हासनगर वाहतूक विभागात पाठवण्यात आले आहे. गोंदिया येथून ठाणे शहर येथे बदलून आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांची ठाणे शहर पोलीस विभाग (प्रसाशन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश माने -पाटील मुख्यालय-२ ते कल्याण वाहतूक विभाग, जयराम मोरे यांच्याकडे मुख्यालय १ चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता तेथून त्यांची बदली डोंबिवली विभागात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांच्याकडे ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मंदार धर्माधिकारी ठाणे शहर मुख्यालय -२ तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले भिवंडी पूर्व विभाग, औरन्गाबाद येथून बदलून आलेले सहाय्य्क पोलीस आयुक्त जगदीश सातव यांच्याकडे मुख्यालय -१ (ठाणे शहर)चा कार्यभार देण्यात आला आहे.