घरठाणेमनविसे अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर प्राणघातक हल्ला

मनविसे अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर प्राणघातक हल्ला

Subscribe

उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मनोज शेलार हे आज, गुरुवारी सकाळी अंबरनाथला मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर चार अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. उल्हासनगर मनपाच्या शिक्षण मंडळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणल्यामुळेच संबंधितांनी माझ्यावर हल्ला केला, असा आरोप मनोज शेलार यांनी केला आहे.

मनोज शेलार (मनविसे अध्यक्ष उल्हासनगर) मी आणि माझे सहकारी उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील येथील भ्रष्टाचाराची प्रकरणे सतत उघडकीस आणत आहे, शहरातील शाळा तोडून तेथे अनधिकृत बांधकामे केली जात आहेत, चुकीच्या पध्दतीने टेंडर काढली जात आहेत यात मनपाचे काही अधिकारी आणि ठेकेदार समाविष्ट आहेत, या प्रकरणी आम्ही आंदोलने, उपोषणे केली आहेत. महाराष्ट्र शासनाकडे तक्रारी केल्या आहेत त्यामुळे हा हल्ला झाला आहे.

- Advertisement -

– मनोज शेलार, अध्यक्ष, मनविसे

उल्हासनगर – ५ येथे राहणारे मनोज शेलार हे त्यांच्या मित्रासह आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास अंबरनाथ येथील शिवगंगानगर जवळील सर्व्हिस रोड येथून नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, तेथून परत येत असताना दोन मोटारसायकलवर चार अज्ञात आरोपी त्यांच्या मागून आले त्यापैकी मोटारसायकलच्या मागे बसलेला एक जण हातात तलवार घेऊन शेलार यांच्या दिशेने येत होता. त्याने शेलार यांच्या मानेचा वेध घेऊन वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मार्निग वॉकला आलेल्या काही महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड ऐकून शेलार यांनी मागे बघितले, तेव्हा हल्लेखोर तलवारीने त्यांच्यावर हल्ला करताना बघून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तलवारीचा वार त्यांच्या हातावर लागला आणि ते जमिनीवर पडले. दरम्यान, हल्लेखोर तेथून पळून गेले.

- Advertisement -

या प्रकरणी मनोज शेलार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी चार अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यावेळी मनसेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष बंडू देशमुख, अंबरनाथ मनसे अध्यक्ष कुणाल भोईर, शैलेश शिर्के, सचिन कदम, प्रदीप गोडसे, अविनाश सुरसे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आरोपींच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा –

आरेची जागा राखीव वन घोषित, प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -