घरक्राइमनववर्ष स्वागतासाठी ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त

नववर्ष स्वागतासाठी ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ५ हजार पोलीस यंदा तैनात करण्यात आले असून विशेष करून हॉटेल, पब्स, रिसॉर्ट, लॉजेस आदींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे.

यंदा कोरोना या साथीचा आजार रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने राज्यातील प्रमुख शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. यामुळे यंदाच्या नववर्षाच्या स्वागतावर विरजण आले असले तरी अनेक ठाणेकर मंडळी नवीनवर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबासह शहराबाहेर पडले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी सरकारी यंत्रणेकडून थर्टीफर्स्टच्या दिवशी विशेष काळजी घेतली जात असून ठाणे पोलीस यंत्रणादेखील यासाठी सज्ज झाली आहे. संचारबंदी आणि राज्य शासनाच्या नियमाचे आदेश मोडणाऱ्यावर पोलिसांचे यावेळी विशेष लक्ष असणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ५ हजार पोलीस यंदा तैनात करण्यात आले असून विशेष करून हॉटेल, पब्स, रिसॉर्ट, लॉजेस आदींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे.

लंडन शहरासह पूर्व यरोपियन देशात नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून त्या विषाणूचा प्रसार खूप वेगाने होत असल्यामुळे खबरदरीचे उपाय म्हणून राज्य शासनाने २२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत कलम १४४ (३) रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. शहरात ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध ठिकाणी पार्ट्याचे आयोजन करण्यात येते. यामुळे नागरिक एकत्र येऊन थर्टिफर्स्टचे सेलिब्रेशन करतात. परंतु, यावर्षी थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आले असून नागरिकांनी घरी राहूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे यासाठी ठाणे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

५ हजार पोलिसांची फोज तैनात

ठाणे पोलीस आयुक्तलयात येणाऱ्या भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वागळे इस्टेट, आणि ठाणे या पाच परिमंडळात सुमारे ५ हजार पोलिसांची फोज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये पाचही परिमंडळातील पोलीस उपायुक्त, १७ सहाय्यक पोलीस आयुक्त, १२८ पोलीस निरीक्षक, १५० सपोनि/ पोउनि, ३५०० पोलीस अंमलदार, ९५० महिला अंमलदार, ३ राज्य राखीव दलाच्या तुकड्या, २ आरसीपी प्लाटून, १० इतर स्ट्रॅकिंग मोबाईल, ३०० होमगार्ड असणार आहे.

३१ डिसेंबर रोजी सकाळपासून पोलिसांची ही फोज रस्त्यावर तैनात राहणार असून शहरातील सर्वच प्रमुख चौकात नाकाबंदी करून ड्रकं अँड ड्राइव्ह कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे. वाहनचालकाच्या हालचालीवर संशय आल्यास त्याची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिनद्वारे तपासणी करून मद्यपान केले आहे का? हे तपासले जाणार आहे. अशा मद्यपी चालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची फिरती पथकेही तयार करण्यात आली आहेत. विनाकारण रस्त्यावर वाहने फिरवणारे, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर यावेळी कडक कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील तलाव, खाडी किनारा, हॉटेल्स आणि इतर महत्वाच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

- Advertisement -

वाहतूक शाखेचे ८० पोलीस अधिकारी आणि ४५० पोलीस कारवाई मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर विविध पोलीस ठाणे, मुख्यालय आणि राखीव पोलीस असे मिळून सुमारे ५ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.


हेही वाचा – थर्टी फस्टसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -