घरठाणे७ महिन्यात ७ वेळा डोकं भादरून केली कोरोनाविषयी जनजागृती

७ महिन्यात ७ वेळा डोकं भादरून केली कोरोनाविषयी जनजागृती

Subscribe

बहीण आणि भावाचे नाते अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. यंदा मात्र देशभरात कोरोनाचे संकट असल्यामुळे भाऊबीज एकत्रितपणे साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी, बिहारला गावी जाता आले नाही म्हणून एका भावाने डोक्यावरील केसात ‘हॅपी भाईदुज’ असे अक्षर कोरून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने दोन्ही बहिणीचा आशीर्वाद घेतला. शंकरकुमार साहू असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील गया जिल्ह्याचा रहिवाशी आहे. सध्या तो भिवंडीतील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे (सुपरवायरज)चे काम करून भिवंडीतील हनुमान नगर परिसरात गेली ९ वर्षापसून राहतो.

गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील केसात अक्षर कोरून कोरोना विषयी जनजागृती

कोरोनाच्या काळात सुरवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी त्यानेही लॉकडाऊन काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरून तो राहत असलेल्या परिसरात कोरोना विषयी जनजागृती करीत होता. त्याने गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीसाठी अक्षरे कोरून नागरिकांनी कोरोनापासून कसा बचाव करावा, असे संदेश देत होता.

- Advertisement -

बहिणीच्या आठवणीने झाला भावूक

शंकरकुमार याला तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोघीही बिहार मधील गया जिल्ह्यात राहतात. तर एका बहिणीचे निधन झाले आहे. शंकरकुमार सांगतो की, भिवंडीत वर्षभर काम करीत असताना केवळ मूळगावी बहिणीसोबत दिवाळी साजरी करणासाठी मी दरवर्षी जात होतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे जाता आले नाही. त्यामुळे सातव्यांदा डोक्यावरील केसात बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी हॅपी भाईदुज अक्षरे कोरली आणि व्हिडिओ कॉलिंग करून बहिणींचे आशीर्वाद घेतल्याचे सांगत शंकरकुमार भावूक झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -