घरठाणेयोग्य वेळी योग्य निर्णय घेऊ...सध्या भाजपला सत्तेपासून रोखणे आवश्यक

योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ…सध्या भाजपला सत्तेपासून रोखणे आवश्यक

Subscribe

महाविकास आघाडीत ज्या ज्या वेळी जे निर्णय होतील ते निर्णय सर्वांना बंधनकारक आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊच, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले, औरंगाबाद नामांतराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराजांबद्दल आम्हाला कायमच आदर आहे. आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली आहे. फक्त एखाद्या गोष्टीचा परिणाम चुकीच्या पद्धतीने होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मंत्री आणि अन्य महत्त्वाच्या जबाबदार्‍या आल्याने पक्षाच्या माध्यमातून तरुणांना, नवीन रक्ताच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, या मताचा मी आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी, मनोज शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

संभाजीनगर विषयावर चर्चा करण्याचे कारण नाही. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. तसेच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठाण्यात असताना शुक्रवारी केले. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला शुक्रवारी थोरात हे ठाण्यात आले होते. ही भेट झाल्यानंतर त्यांनी शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयास भेट दिली. काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकारांना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीमध्ये आम्हाला आमच्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यरत व्हावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -