घरठाणेराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला

Subscribe

गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री कल्याण पूर्व येथे घडली. या हल्ल्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने निरक्षकासह चार जण जखमी झाले असून त्यानं उपचारासाठी खासगी रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

सुनील कणसे, गणेश पाटील तसेच भरारी पथकातील इतर दोघे जण या हल्ल्यात जखमी झालेले आहे. सुनील कणसे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे जिल्हा भरारी पथकातील निरीक्षक आहेत. गांधी सप्ताह सुरु असताना देखील कल्याण येथील चिंचपाडा येथून गावठी दारूची बेकायदेशीर वाहतूक सुरु असल्याची माहिती ठाणे जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कणसे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक कणसे हे यांनी पथकासह सोमवारी रात्री कल्याण पूर्व चिंचपाडा येथे सापळा रचून गावठी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी एक मोटार ताब्यात घेऊन कल्याण पूर्व येथील कार्यालयात घेऊन जात असताना दोन मोटारीतून आलेल्या सात ते आठ जणांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरारी पथकाची मोटार अडवली. त्यानंतर आमच्या मोटारीवर कारवाई का करतात असा जाब विचारत या टोळक्याने भरारी पथकावर लाठ्याकाठ्यानी हल्ला केला.

- Advertisement -

या हल्ल्यात निरीक्षक सुनील कणसे यांच्यासह पथकातील चार जण गंभीर जखमी झाले. दरम्यान भरारी पथकाच्या मदतीसाठी कल्याण येथून राज्य उत्पादन शुल्क आणि कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांची धरपकड करून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर हल्लेखोर काळोखाचा फायदा घेऊन पळून गेले. घटनास्थळी दाखल झालेल्या कोळसेवाडी पोलिसांनी जखमी अधिकारी कणसे यांच्यासह चौघांना खासगी रुग्णलायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, गैरकायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लहू हाल्या म्हात्रे (३४), नरेश भोईर (२९) आणि संतोष लहू पाटील (४०) या तिघांना अटक करण्यात आलेली असून पळून गेलेल्या इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

हेही वाचा –

UP सरकारवर अजून एक बट्टा; बलात्कार झालेल्या ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -