घरठाणेदे धक्का...रस्त्यातच बंद पडली फायर ब्रिगेडची गाडी...

दे धक्का…रस्त्यातच बंद पडली फायर ब्रिगेडची गाडी…

Subscribe

अग्निश्यामन दलाच्या गाडीचा एक्सेल तुटल्याने गाडी जाग्यावरच थांबली असल्याची घटना घडली आहे.

मीटर बॉक्सला आग लागल्याची सूचना मिळताच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निश्यामन दलाची गाडी निघाली. मात्र, अग्निश्यामन दलाच्या गाडीचा एक्सेल तुटल्याने गाडी जाग्यावरच थांबली. सुदैवाने छोटी आग असल्याने विझली होती. त्यानंतर कर्मचारी आणि दलाच्या जवानांनी धक्का मारून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला.

वाटेतच बंद पडली अग्निशमन दलाची गाडी; कर्मचाऱ्यांनी दिला धक्का!

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला कर्मचाऱ्यांनी दिला धक्का

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, September 7, 2020

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निश्यामन दलाच्या जवानावर अनेक कामगिरी देण्यात येत आहे. आग लागली, झाडे पडली, पुरात अडकले आणि आता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करणे, राजकीय नेते दौरा सभा आदी कामगिरी करावी लागत आहे. यात वाहनाचा सहभाग असून अतिकामाचा ताण कसा आहे. आज समोर आले आहे. कल्याण पश्चिम मधील बेतूरकर पाडा परिसरात एका मीटर बॉक्सला आग लागल्याची वर्दी मिळताच आधारवाडी फायर स्टेशन वरून फायर गाडी क्रमांक (एम एच 05-एन 0257 ) ही निघाली. मात्र, गाडीचा एक्सेल तुटल्याने रस्त्यात गाडी थांबल्याने काही काळ वाहतूक वळवली होती. सुदैवाने महावितरण विभाग कर्मचारी जागेवर पोहचून विद्युत पूरवठा खंडित केला आणि पुढील दुर्घटना टळली. अग्निश्यामन जवान ही चालत पोहचले.

मात्र, आग विझली म्हणून परत आले तेव्हा रस्त्यात गाडी बंद पडली होती. छोटे रस्ते होते म्हणून छोटी गाडी पाठवली होती. ती पाच वर्षे पूर्वी ताप्यात जॉईन झाली होती. त्याचे एक्सेल तुटल्याने गाडी बंद पडली. दरम्यान, सध्या दुरुस्ती सुरू असून वाहन आहे ते कधी ही बंद पडू शकते अशी माहिती अग्निश्यामन दलाकडून देण्यात आली. छोटी आग होती म्हणून मोठी दुर्घटना टळली. एकीकडे अग्निशमन दल हे अत्यावश्यक सेवेत मोडत असून कायम तत्पर राहिले पाहिजे. मात्र, कल्याण डोंबिवली अग्निश्यामन दल जवान आणि त्यांच्या वाहनावर एवढा ताण वाढला असून त्यावर नियोजन करण्याची मागणी होत आहे, म्हणजे वाहनांची वेळोवेळी दुरुस्ती, पर्याय व्यवस्था आणि फायर जवानांना वेळेवर आराम आणि त्याचा मोबदला ही द्यावा अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: दिलासा! पोलीसबाधितांच्या संख्येत घट; २४ तासांत राज्यात १७९ पोलिसांना कोरोना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -