घरठाणेठाण्यात मेडिकलमध्ये शिरला कोल्हा अन्...

ठाण्यात मेडिकलमध्ये शिरला कोल्हा अन्…

Subscribe

कोल्हा दिसल्याने दुकान मालकाची उडाली चांगलीच तारांबळ

ठाण्यातील नेहमीच गजबजलेल्या खारकर आळी परिसरातील मेडिकल दुकानात अचानक सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक कोल्हा शिरला. सुरुवातीला कुत्रा समजून त्याला मेडिकल दुकानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न मालकाने केला. त्यानंतर तो कुत्रा नसून कोल्हा असल्याचे समोर आले आणि दुकान मालकाची चांगलीच तारांबळ उडाळी. हा प्रकार घडताच तातडीने वनविभागाला दुकानात पाचारण केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन तासानंतर या कोल्ह्याला दुकानातून बाहेर काढण्यात यश आले. अशाप्रकारे भर गजबजलेल्या मार्केटमध्ये कोल्हा येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

ठाण्यातील खारकर आळी परिसरातील राहुल पांडे यांच्या श्री मेडिकलमध्ये कोल्हा शिरला. त्यावेळी तो कोल्हा सरळ दुकानात जाऊन बसला. सुरुवातीला तो कुत्रा असल्याचे वाटल्याने त्याला झाडूने बाहेर काढण्याचा प्रयत्न दुकान मालकाकडून करण्यात आला. मात्र कोल्ह्याने झाडू देखील पकडून ठेवला. त्यानंतर हा कुत्रा नसून कोल्हा असल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाची तारांबळ उडाली.

- Advertisement -

दरम्यान, दुकानात शिरलेला कुत्रा नसून कोल्हा असल्याचे लक्षात आल्यावर मेडिकल दुकान बंद करण्यात आले आणि कोल्ह्याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर त्याला वनविभागाने या कोल्ह्याला यशस्वीरित्या पकडले. ठाण्यातील वनविभागाचे अधिकारी संजय पवार यांनी असे सांगितले, “त्या कोल्ह्याला वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोशिएशन तसेच प्राणी मित्र संस्था यांच्या मदतीने अडीच तासानंतर पकडले. हा कोल्हा ठाणे खाडी परिसरातून आला असावा, या कोल्ह्याच्या मागे कुत्रे लागले असल्याने तो मेडिकलमध्ये घुसला असावा. हा परिसर ठाणे खाडी पासून ५०० मीटरवर आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -