घरठाणेकोरोना Antigen Test विना परराज्यातील शेकडो कुटुंबे ठाण्यात!

कोरोना Antigen Test विना परराज्यातील शेकडो कुटुंबे ठाण्यात!

Subscribe

२४ तास Antigen Test सेंटरची संजय वाघुलेंची मागणी

ठाणे रेल्वे स्टेशनवर सुरू असलेली अॅंटिजन टेस्ट टाळत अनेक रिक्षाचालकांकडून परराज्यातील शेकडो कुटुंबांना परस्पर ठाण्यातील विविध भागात सोडण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे कोरोना टेस्टविना ठाणे शहरात हजारो नागरिक दाखल झाले असल्याचा अंदाज आहे. त्यातून भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची भीती लक्षात घेऊन, ठाणे रेल्वे स्टेशनवर २४ तास अॅंटिजन टेस्ट सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे. त्याचबरोबर बेकायदेशीरपणे प्रवासी पळविणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

परराज्यातून ठाणे स्टेशनवर उतरणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील नागरिकांची तपासणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वे स्टेशनवर मोफत अॅंटिजन सेंटर सुरू केले आहे. मात्र, या केंद्राची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत आहे. गेल्या काही दिवसांपासून परराज्यातून पहाटेच्या सुमारास रेल्वेगाड्या येतात. त्यातून उतरणाऱ्या नागरिकांना अॅंटिजन टेस्टसाठी सकाळी साडेदहापर्यंत थांबावे लागते. या काळात काही रिक्षाचालकांकडून बेकायदेशीरपणे परराज्यातील नागरिकांना अॅंटिजन टेस्ट टाळून परस्पर शहरात नेले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून अवाच्या सवा भाडे उकळले जात आहे, याकडे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. या परिस्थितीमुळे भविष्यात ठाणे शहराला उद्भवणारा धोका लक्षात घेऊन तातडीने ठाणे रेल्वे स्टेशनवर २४ तास अॅंटिजन टेस्ट सेंटर सुरू करावे, अशी मागणी वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

सॅटिस पूलावरील अॅंटिजन सेंटरवरील रांगेत असलेल्या व पहाटे येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची बेकायदेशीरपणे रिक्षाचालकांकडून वाहतूक केली जात आहे. या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आणखी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना दंड ठोठवावा, अशी मागणी वाघुले यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त अमित काळे यांच्याकडे केली आहे.


Mumbai Corona: आज दिवसभरात २,८२३ नवे रूग्ण; ४८ जणांचा कोरोनामुळे बळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -